प्रेरणादायी उपक्रम : बारामतीत उभारली माणुसकीची भिंत!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

प्रत्येकाच्या घरात काही जास्तीच्या आणि दुरूपयोगी वस्तू पडून असतात. या वस्तू लोकांनी या शेडमधील रॅकवर आणून ठेवाव्यात, ज्यांना गरज आहे त्यांनी त्या उचलून घेऊन जाव्यात.

बारामती : ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे इतके आहे, की ठेवायला जागा नाही. आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे काहीच नाही, अशी विषमतेची दरी समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे जुन्या, वापरण्यायोग्य आणि इतरांची गरज पूर्ण होईल, अशा वस्तू किंवा इतर साहित्य आणून माणुसकीच्या भिंतीवरील रॅकमध्ये ठेवावे आणि ज्यांना त्याची गरज आहे, त्यांनी ते कधीही उचलून घेऊन जावे, अशा प्रकारचा उपक्रम बारामतीत सुरू करण्यात आला आहे.

- चंद्रकात पाटलांनी जनतेलाच विचारले, आमचं काय चुकलं?

माणुसकीच्या भिंतीची संकल्पना बारामतीत राबविण्याचा निर्णय येथील श्री विमलयोग ग्रुपने घेतला आणि नुसती चर्चा करत बसण्यापेक्षा त्यासाठी स्वखर्चाने शेड उभारुन त्यात रॅकही लावून घेतल्या. दररोज सकाळी योगासाठी जमणाऱ्या या ग्रुपने माणुसकीच्या भिंतींची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. 

- पाडवा, भाऊबीजेला गिफ्ट देताय? 'हे' स्मार्टफोन्स आहेत बेस्ट पर्याय!

भिगवण रस्त्यावरील श्री विमलनाथ मंदिराशेजारी एका शेडमध्ये रॅक लावण्यात आले आहे. संकल्पना अशी आहे की, प्रत्येकाच्या घरात काही जास्तीच्या आणि दुरूपयोगी वस्तू पडून असतात. या वस्तू लोकांनी या शेडमधील रॅकवर आणून ठेवाव्यात, ज्यांना गरज आहे त्यांनी त्या उचलून घेऊन जाव्यात. आपल्याकडे आहे ते ज्यांच्याकडे नाही, त्यांना विनामूल्य देऊ करावे आणि माणुसकीची जपणूक करावी, अशी या उपक्रमा मागील संकल्पना आहे.

- दिशा पटानीचा 'हा' हॉट फोटो पाहिला का?

या रॅकवर विभाग करण्यात आले असून महिला-पुरुषांच्या कपड्यांसह, घरगुती सामान, खेळणी, चप्पल, बूट, शालेय साहित्य, थंडीचे कपडे, लहान मुलांचे कपडे, साड्या, बॅग अशी रचना करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना गरजूंना आपल्याकडील असे साहित्य देण्याची इच्छा आहे, त्यांनी असे साहित्य येथे आवर्जून ठेवावे, असे आवाहन विमल योग ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help for humanity activity started by Yoga group in Baramati