'एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया'ची पाणी फाउंडेशनला मदत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

बारामती : तालुक्यात सुरु असलेल्या पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण चळवळीस सक्रीय मदत करण्याच्या दृष्टीने 'एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया' या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेत आर्थिक मदतीसह श्रमदानातही सहभाग घेतला. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनीही या कामी सहभाग नोंदविला. 

फोरमच्या वतीने तालुक्यातील कटफळ, सिध्देश्वर निंबोडी व मुर्टी येथे अनुक्रमे 60 व 65 तासांच्या इंधनाची रक्कम ग्रामस्थांना दिली गेली. सावंतवाडी व पानसरेवाडी मध्ये 100 तासांचे इंधन सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून फोरमच्या वतीने देण्यात आले. दरम्यान जळगाव, पानसरेवाडी येथेही फोरमचे कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते. 
फोरमच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून ओढा खोलीकरण व सरळीकरणाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरु आहेत. बारामती व दौंड तालुक्यात 26 गावातून ओढा खोलीकरण व सरळीकरणाचे काम फोरमने केले. जवळपास चोवीस किमी लांबीचे काम या माध्यमातून झाले आहे. यातून जवळपास 53 कोटी लिटर अतिरिक्त पाण्याचा साठा होणार आहे आणि तितकेच पाणी जमिनीत मुरणार आहे. 26 गावातील 40 हजारांहून अधिक लोकांना याचा थेट फायदा मिळणार आहे. बारामती तालुक्यातील तरडोली, वाकी, शिर्सुफळ व सिध्देश्वर निंबोडी या गावातील तलावातला गाळ काढण्याचेही काम फोरमच्या वतीने प्रकल्प मेघदूत अंतर्गत करण्यात आले.

Web Title: help for pani foundation