रेडणीमध्ये सकाळ रिलिफ फंडातुन ओढाखोलीकरणाच्या कामास सुरवात

राजकुमार थोरात
शनिवार, 14 जुलै 2018

वालचंदनगर : रेडणी (ता.इंदापूर) येथे  सकाळ रिलीफ फंड व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ओढाखोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

वालचंदनगर : रेडणी (ता.इंदापूर) येथे  सकाळ रिलीफ फंड व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ओढाखोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

इंदापूर तालुक्यामध्ये रेडणी गावालगत मोठा ओढा आहे. गेल्या अनेक वर्षापासुन ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचा काम झाले नसल्यामुळे ओढ्यामध्ये गाळ साचलेला आहे. तसेच झाडेझुडपे ही उगवली असल्याने पावसाळ्यामध्ये ओढ्यामधून पावसाचे पाणी वाहुन जात असल्याने रेडणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सकाळ माध्यम समुहाकडे ओढा खोलीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी केली होती. सकाळ रिलिफ फंडातुन ओढ्याच्या खोलीकरणासाठी दोन लाख रुपयांचा निधी देण्यात आला अाहे. तसेच पुण्यातील उद्योजक विनायक वाळेकर यांनी गावासाठी मोफत पोकलेन मशिन उपलब्ध करुन दिली आहे.

या कामाचा शुभारंभ माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.13) करण्यात आला. यावेळी निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजित पाटील, चंद्रकांत भोसले, सहकारमहर्षी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्‍वास काळकुटे,अर्बन बॅंकेचे संचालक सत्यशिल पाटील,मोहन दुधाळ,बावड्याचे सरपंच किरण पाटील, जंक्शन सरपंच राजकुमार भोसले,मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष भिसे,कुलदीप रकटे, प्रकाश शेडगे, हनुमंत कदम,शहाजी ननवरे,प्रदीप बोरकर, दिगांबर गर्जे, रामभाऊ पाटील,नितीन जाधव,ग्रामसेवक अर्चना लोणकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सकाळचे वालचंदनगरचे बातमीदार राजकुमार  थोरात,सुत्रसंचालन माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले व आभार रेडणीचे सरंपच भीमराव काळे यांनी मानले.

‘सकाळ’ माध्यम समुहामुळे इंदापूरकरांची सकाळ चांगली... 
यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, सकाळ माध्यम समुहाच्या ओढाखोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा  इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना व गावातील नागरिकांना फायदा होत आहे. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे  अनेक गावातील पाण्याची पातळी वाढली असून सकाळमुळे इंदापूरकरांची सकाळची सुरवात चांगली होत असून सकाळच्या उपक्रमाचे कौतुक केले.  

Web Title: with the help of sakal relief fund work starts in redani