बाणेर, बालेवाडीत पूरबाधित कुटुंबीयांना मदतीचा हात 

sheetal.jpeg
sheetal.jpeg


पुणे ः मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे मुळा नदीला आलेल्या पुराचा फटका नदीकाठच्या अनेक नागरिकांना बसला. बाणेर, बालेवाडी, औंध परिसरातील बाधित कुटुंबीयांना अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केला. त्यातील बाणेर बालेवाडी पाषाण रेसिडेन्सी असोसिएशनचे (बी.बी.पी.आर.ए.) योगदान उल्लेखनीय होते. 

पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसल्याने अनेक नागरिकांना प्रशासनाच्या मदतीने बालेवाडीतील महापालिकेच्या शाळेत तात्पुरता आसरा देण्यात आला होता. अंगावरच्या कपड्यानिशी हे नागरिक घराबाहेर पडल्यामुळे त्यांच्या पोटापाण्याबरोबरच झोपण्यासाठी अंथरूण पांघरुणाचा प्रश्‍न निर्माण झाला. या वेळी बी.बी.पी.आर.ए. या संघटनेचे कार्यकर्ते मदतीला धावून आले. ही एक बिगर राजकीय संघटना असून बाणेर, बालेवाडी, पाषाण या ठिकाणच्या बहुतांश सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांचा यात समावेश आहे. 

पूरग्रस्तांच्या मदतीच्या हाकेला प्रतिसाद देत अनेक सोसायट्यांकडून जेवण, फळे, ब्लॅंकेट, चादरी असा मदतीचा ओघ सुरू झाला. या शाळेत 700 पूरग्रस्तांना ठेवण्यात आले होते. त्यांना वाटप करून उरलेले साहित्य बोपोडी, शिवाजीनगर, औंध या ठिकाणी पाठवण्यात आले. बाणेर येथील ब्रिव्हेरिया, शिवनेरी पार्क, कमफोर्ट झोन आदी सोसायट्यांनी काही नागरिकांची आश्रयासह भोजनाची व्यवस्था केली. 
संघटनेच्या आरती रुणवाल यांनी लहान मुलांचे खेळ वर्ग, योगासने घेतली. जया रमेश यांनी सलग पाच दिवस सर्व लहान मुलांसाठी दूध पुरवले. बाणेर- बालेवाडी मेडिकल असोसिएशनकडून डॉ. राजेश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली तीस डॉक्‍टरांचे पथक मोफत वैद्यकीय सेवा पुरवीत होते. 
पूर बाधितांना घरी गेल्यावर साधारण पंधरा दिवस पुरेल एवढ्या धान्यासह मुलांसाठी शालेय साहित्य देण्यात आले. 
चार दिवस कामावर सुट्टी घेऊन प्रशांत पाटील, सारंग वाबळे, सुधीर जोशी, गिरिधर राठी, अक्षय म्हसे, कुणाल लुंकड आदींसह बी.बी.पी.आर.च्या अन्य सदस्यांनी कामाचे नियोजन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com