सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्याकडून या बालकांना मोठी मदत

मिलिंद संगई
Saturday, 30 May 2020

लहान वयातच मधुमेहाने ग्रासलेल्या मुलांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार धावून आले आहेत. 

बारामती (पुणे) : मधुमेहाचा त्रास फक्त मोठ्यांनाच होतो, असे अजिबात नसते, छोट्या बालकांनाही याचा फटका बसतो. अशाच लहान वयातच मधुमेहाने ग्रासलेल्या मुलांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार धावून आले आहेत. 

दोघी बहिणींची भटकंती निसर्गसेवेसाठी

अनेकदा जन्मतः किंवा अनुवंशिक असल्याने छोटया मुलांना मधुमेह झालेला दिसतो. अशा मुलांसाठी 
सुप्रिया सुळे व अजित पवार यांनी त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी जहॉंगिर ट्रस्टच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यातील छोट्या बालकांना डायबेटीस टाईप 1 च्या इन्सुलिन उपलब्ध करुन दिले. बारामती येथील राष्ट्रवादी भवन येथे प्रातिनिधिक स्वरुपात 50 मुलांना याचे वाटप केले गेले. 

भीतीची छाया आणि त्यातही पुणेकरांसाठी आली गुड न्यूज

या अगोदरच्या टप्प्यात 27 बालकांना हे इन्सुलिन उपलब्ध करुन दिले आहे. ही सर्व बालके अठरा वर्षांच्या आतील आहेत. या शिवाय कारगिल कंपनीच्या वतीने जीवनाश्यक वस्तूंचेही वाटप केले गेले. एका गरजू विद्यार्थ्यांला बारा हजारांचे रेफ्रिजेटर प्रदान केले गले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

या प्रसंगी इन्सुलिन किट-मेडिसिन, रेफ्रिजरेटर व जीवनावश्यक वस्तू, अशा 6 लाखांच्या अत्यावश्यक वस्तूंचे वाटप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, मंत्रालय कक्ष अधिकारी अमोल भिसे, डॉ. सौरभ मुथा, जहाँगीर ट्रस्टच्या डॉ. संध्या गायकवाड व सहका-यांच्या हस्ते करण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helping hand to children from Supriya Sule and Ajit Pawar