वृत्तपत्र विक्रेत्याच्या कुटुंबियांना वाचकांकडून मदतीचा हात

कोथरूड येथील पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या भुसारी कॉलनी विभागातील विक्रेते दिपक बडंबे (वय ४०) यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. कुटुंबातील ते एकमेव कमावते होते.
Help
HelpSakal

पुणे - कोथरूड येथील पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या (Pune Newspaper Seller Organisation) भुसारी कॉलनी विभागातील विक्रेते दिपक बडंबे (Deepak Badambe) (वय ४०) यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. कुटुंबातील (Family) ते एकमेव कमावते होते. यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर अचानक मोठे संकट (Disaster) कोसळले. त्यांच्या निधनाची बातमी बावधन परिसरातील सोसायट्यांमधील वाचकांना (Reader) समजली आणि संकटात सापडलेल्या बडंबे कुटुंबाला मदतीचा (Help) ओघ सुरू झाला. (helping hand readers family newspaper vendor)

बडंबे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले, असा परिवार आहे. ते बावधन परिसरातील काही सोसायट्यांमध्ये वृत्तपत्र वितरणाचे कामकाज करत होते. प्रिस्टीन फॉन्टना सोसायटीमधील सर्व सभासदांनी ६३ हजार ५०० रुपयांची रक्कम वर्गणी रूपाने गोळा केली. या रकमेचा धनादेश दिपक बडंबे यांच्या पत्नी तनिष्का यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच सोसायटी व पुणे वुत्तपत्र विक्रेता संघाने बडंबे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे जाहीर केले.

या वेळी सोसायटीचे अध्यक्ष मनोहर गोळे, अमोल चौधरी, प्रसाद महाजन, सुनिल फडतरे, शितल करंदीकर, संघाचे अध्यक्ष विजय पारगे, सचिव अरुण निवगुंणे, विश्वस्त अमित जाधव, विभाग प्रमुख अनिल शिंदे, रमेश उभे व राकेश अमराळे आदी उपस्थित होते.

Help
पुण्यात दररोज १२१० रुग्ण होताहेत कमी; आतापर्यंत ६६ हजार कोरोनामुक्त

पारगे म्हणाले, ‘‘बडंबे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, या आर्थिक मदतीतून त्यांना सावरण्यास मदत झाली आहे. विक्रेता व वाचक हे एकाच परिवारातील सदस्य आहेत, याचीही जाणीव याद्वारे झाली.’’ ‘सकाळ’सह इतर वृत्तपत्रांच्यावतीने देण्यात आलेले आर्थिक मदतीचे २५ हजार २०० रुपयांचे धनादेश कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आले.

कोरोनाच्या काळातही वाचकांनी वृत्तपत्रास सकारात्मक प्रतिसाद दिला. या काळात त्यांनी विनाकारण पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवला नाही. ‘ग्राहक देवो भव’ या भुमिकेमुळे वृत्तपत्र विक्रेता आजच्या परिस्थितीतही टिकून आहेत. बावधनमधील सोसायटीने विक्रेत्याबद्दल दाखवलेला आपलेपणा हा रक्ताच्या नात्या सारखा ठरला आहे.

- विजय पारगे, अध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com