
पुणे जिल्ह्यातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात
पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) ग्रामीण भागातील (Rural Area) व शहर परिसरातील गरजू व पाचवी ते नववीच्या निवडक विद्यार्थ्यांच्या (Students) शिक्षणासाठी (Education) सकाळ सोशल फाउंडेशन, (Sakal Social Foundation) लोहिया प्रतिष्ठान व संलग्न इतर ट्रस्ट आणि के अँड क्यू परिवार यांच्या संयुक्त सहकार्याने शैक्षणिक साहित्य (Educational Equipment) मदत (Help) प्रकल्प राबविण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जूनमध्ये उपक्रमासाठी पात्र व निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येईल. गरजू विद्यार्थ्यांचे अर्ज ‘सकाळ’ प्रतिनिधींमार्फत स्वीकारण्यात येणार आहेत.
समाजाची हवी साथ
एका विद्यार्थ्याच्या शैक्षणिक साहित्य किटची किंमत तीन हजार पाचशे रुपये आहे. प्राथमिक टप्प्यात तीनशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. पुणे जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील जास्तीत-जास्त शालेय विद्यार्थ्यांना उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, विविध संस्था व आस्थापना यांच्या सामूहिक मदतीची गरज आहे.
असे करा साह्य
शैक्षणिक साहित्य मदत प्रकल्पासाठी https://socialforaction.com/ ही लिंक ओपन करून, समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक या प्रकल्पाची माहिती घेऊ शकतात. तसेच डोनेट नाऊ या बटनवर क्लिक करून थेट ऑनलाइन देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

Sakal Social Foundation
असे असणार किट
स्कूल बॅग
फुलस्केप वह्या (दोन किंवा तीन डझन)
कंपास बॉक्स
वॉटर बॉटल
टिफिन बॉक्स
वॉटर कलर
चित्रकला वही
परीक्षा पॅड
बूट व सॉक्स
रेनकोट
स्वेटर
स्पोर्ट्स शूज
स्पोर्ट्स गणवेश (टी शर्ट व हाफ पॅन्ट)
सतरंजी
चादर
उन्हाळी टोपी
खालील बँक खात्यात देणगीची रक्कम ऑनलाइन पाठवू शकता
Sakal Social Foundation
Bank Name :- IDBI Bank, Laxmi Road, Pune.
Bank A/C no :- 459104000021252
IFSC Code :- IBKL0000459
किंवा मदतीचे धनादेश ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ या नावाने काढून, प्लॉट नंबर २७, नरवीर तानाजीवाडी, पीएमपीएल बस डेपो जवळ, शिवाजीनगर पुणे - ५ या पत्यावर पोस्टाने व कुरिअरने पाठवू शकता. धनादेशाच्या मागे देणगीदाराचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक लिहावा.
अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सॲप : ८६०५०१७३६६
Web Title: Helping Hand To Needy School Children In Pune District Sakal Social Foundation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..