आजारांसाठी पालिकेची मदत?

PCMC
PCMC

पिंपरी - चिंचवडमध्ये योग भवन उभारावे, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी डिजिटल लायब्ररी उभारावी, शहरातील गरीब रुग्णांना हृदयशस्त्रक्रिया, किडनीरोपण व कर्करोग अशा आजारांवर उपचारासाठी ५० हजार रुपयांपर्यंत मदत द्यावी, अशा सुमारे नव्वदपेक्षा अधिक विषयांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याच्या सूचना गुरुवारी (ता. २७) स्थायी समिती सभेत सदस्यांनी मांडल्या. या शिफारशींसह अर्थसंकल्प मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत मांडला जाईल.

महापालिकेचा पाच हजार २३२ कोटी ५७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (ता. १७) स्थायी समिती समोर सादर केला होता. त्यावर अभ्यास करण्यासाठी सदस्यांना दहा दिवसांचा कालावधी दिला होता. त्यानुसार गुरुवारी (ता. २७) स्थायी समितीची अर्थसंकल्पीय बैठक झाली. याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधींनी विविध कामांसह जनकल्याणासाठी योजना व उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठीची तरतूद मूळ अर्थसंकल्पातूनच केली जाणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाची रक्कम वाढणार नसून आयुक्तांनी सुचविलेल्या संबंधित तरतुदीमधूनच निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.’’ अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष खर्च पाच हजार २२६ कोटी ८० लाख रुपये अपेक्षित आहे. म्हणजेच मार्च २०२१ अखेर पाच कोटी ७७ लाख रुपये रक्कम शिल्लक राहील, अशी अपेक्षा आहे. 

अशी आहे आरोग्य योजना 
महापालिका क्षेत्रातील एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या रुग्णांसाठी पद्मविभूषण सुषमा स्वराज जनआरोग्य योजना राबवावी. यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली.

किडनी प्रत्यारोपण, हृदयशस्त्रक्रिया कर्करोग या आजारांवरील उपचारासाठी रुग्णांना ५० हजार रुपयांपर्यंत मदत मिळेल. यासाठी उत्पन्न व रहिवासी दाखला, दोनशे रुपये शुल्क व कुटुंबाचे एकत्रित छायाचित्र द्यावे लागेल. ही रक्कम प्रतिरुग्ण वाढावी व उत्पन्न मर्यादा वाढावी, यावर तज्ज्ञांशी बोलणे सुरू असल्याचे मडिगेरी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com