ज्येष्ठांसाठी हेल्पलाइनचा आधार

r-subrahmanyam
r-subrahmanyam

पुणे - भारतातील एकत्र कुटुंबपद्धती ही एक आदर्श आणि अभिमान बाळगावा अशी परंपरा आहे. ज्येष्ठांविषयीच्या राष्ट्रीय धोरणात भारतीय कुटुंबसंस्था आणि त्यातील मूल्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. देशातील ज्येष्ठांसाठी २६ जानेवारी २०२१ पासून ‘एल्डर हेल्पलाइन’ कार्यान्वित करण्यात येऊ शकते, असे मत दिल्ली येथील सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव आर. सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केले.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जनसेवा फाउंडेशनतर्फे विविध ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने १ ते १३ ऑक्‍टोबर या कालावधीत विविध ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सिंबायोसिस विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, विश्‍वस्त मीना शहा, विश्‍वस्त जयदेव नायक आदी सहभागी झाले होते. या वेळी डॉ. अमरजित सिंघ आणि आर. एन. मित्तल यांचा गौरव करण्यात आला.

हिवाळी अधिवेशनात विधेयक होणार मंजूर
सुब्रह्मण्यम म्हणाले, ‘संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात ज्येष्ठांची काळजी घेण्यासंदर्भातील नवीन विधेयक मंजूर होण्याची शक्‍यता आहे. तसेच शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत असे किमान एक ज्येष्ठ नागरिक गृह निर्माण केले जाणार आहे. देशातील ज्येष्ठांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित जीवन प्रदान करण्यासाठी जनसेवा फाउंडेशनसारख्या संस्थादेखील मोलाची भूमिका बजावत आहेत.’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com