‘अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे राजकारण’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा, ही मागणी चुकीची असून, त्याला शाकाहारी म्हणणे अवैज्ञानिक आहे. अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे आर्थिक राजकारण आहे. त्यामुळे शाकाहाराचे समर्थन करणाऱ्या सर्व संघटना याला एकत्रित विरोध करणार आहेत, अशी माहिती सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी दिली.

पुणे - कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा, ही मागणी चुकीची असून, त्याला शाकाहारी म्हणणे अवैज्ञानिक आहे. अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे आर्थिक राजकारण आहे. त्यामुळे शाकाहाराचे समर्थन करणाऱ्या सर्व संघटना याला एकत्रित विरोध करणार आहेत, अशी माहिती सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी दिली. 

आयुष मंत्रालयाने कोंबडी आणि अंड्याला शाकाहारी म्हणून घोषित करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केली होती, त्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. गंगवाल म्हणाले, ‘‘वैज्ञानिकदृष्ट्या मांसाहारी पदार्थात ‘सेल मेम्ब्रेन’ आणि शाकाहारी पदार्थात ‘सेलवॉल’ असते.

अंड्याला ‘सेल मेम्ब्रेन’ असल्यामुळे ते मांसाहारात मोडतात. कोंबडीच्या गर्भाशयातून येणाऱ्या अंड्याच्या कवचावर १५ हजार सूक्ष्म छिद्रे असतात, त्यांतून आतील स्त्रीबीज श्‍वासोच्छ्वास करीत असते, हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे.’’ ‘‘अफलित अंड्यातदेखील जिवंत स्त्रीबीज असते, त्यामुळे त्याला शाकाहारी म्हणणे चुकीचे आहे, असा निष्कर्ष शास्त्रज्ञ पीटर रॉम्पकिन्स क्रिस्तोर यांनी मांडला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातबाजीच्या तंत्राने अंडी शाकाहारी, पौष्टिक आणि आरोग्याला उत्तम असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे.’’ असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hen Egg Veg Politics