PNE18O60317.jpg
PNE18O60317.jpg

#mynewspapervendor कॉर्पोरेट क्षेत्रात 'तिची' भरारी 

पुणे : हलाखीच्या परिस्थितीसमोर हतबल न होता तिने वृत्तपत्र विक्री सुरू केली आणि आता ती झाली आहे कंपनी मॅनेजमेंट अकाउंटंट. सोनाली चोरगे या वृत्तपत्रविक्रेतीची ही कहाणी. चौथीत शिकत असल्यापासून पहाटे पाच वाजता पेपर विकायला घराबाहेर पडणाऱ्या सोनालीने कष्टाने अनेक आव्हानांचा सामना केला. शैक्षणिक आलेख उंचावताना ती अवघड अशा कंपनी मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए) परीक्षेत उत्तीर्ण झाली. 

घरात वडील एकटे कमावते, तुटपुंजी कमाई अन तीन भावंडे अशा स्थितीत सोनाली तिच्या वडिलांच्या वृत्तपत्र व्यवसायात मदत करू लागली. सकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत पेपर विक्री, बिलांची वसुली ती करत होती. पद्मावती येथे सोनालीचे वडील अशोक चोरगे यांची वृत्तपत्र एजन्सी आहे. मुलीने पेपर विक्री कशी करायची, असा संकोच तिने बाळगला नाही. घरोघरी पेपर टाकण्यात कोणताही कमीपणा तिला कधीच वाटला नाही. घराजवळील लायब्ररीत ती तासनतास अभ्यास करत असे.

एमएमसीसी महाविद्यालयात बी. कॉमचे शिक्षण सोबतच सीएमएचा अवघड अभ्यासक्रम शिकत असताना आपण वडिलांनाही हातभार लावू शकलो, याचा अभिमानच वाटतो, असे सोनालीने सांगितले. सोनाली सध्या खासगी कंपनीत नोकरी करत असून आजही वडिलांची प्रकृती ठीक नसेल तेव्हा ती बालाजीनगरमध्ये घरी जाऊन पेपर टाकते. सोनालीची बहीण स्वप्नालीही बी. कॉमचे शिक्षण घेईपर्यंत घरोघरी पेपर टाकत असे. तिनेही एम. कॉम. पूर्ण केले व ती सध्या एलएल.बीचे (कायद्याचे) शिक्षण घेत आहे. ऑगस्ट 2018 मध्ये ती सीएमएची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com