मध्यरात्रीही सिंहगडावर प्रेमी युगुलांचा मुक्त संचार

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? प्रशासनही गाफील
heritage conservation lovers at Sinhagad fort at midnight forest department pune
heritage conservation lovers at Sinhagad fort at midnight forest department pune sakal

किरकटवाडी : सिंहगडावरील गाडीतळावर असलेला अंधार, डोंगर कपारीत हिंस्र वन्य प्राण्यांचा वावर आणि रस्त्यावर सरपटणारे विषारी साप अशा अत्यंत धोकादायक परिस्थितीत एका दुचाकीवरून प्रेमी युगुल मध्यरात्री दीड वाजता थेट गाडीतळावर येते. मोबाईलवर सेल्फी काढण्यात व्यस्त असतात. न कशाची भीती न जीवाची काळजी. महत्वाचे म्हणजे त्यांना थांबवण्यासाठी चेकपोस्टवरही वन विभागाचे कोणी नसते आणि वर गाडीतळावर आपत्कालीन परिस्थितीत माहिती देणारे अथवा मदतीसाठीही कोणी नसते. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सिंहगडसारख्या पवित्र ठिकाणी असे प्रकार घडत असताना संबंधित प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता रात्री दहा ते साडेदहा वाजल्यानंतर गोळेवाडी येथील चेकपोस्टवर कोणीही नसते अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. चेकपोस्टवर अडवण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी रात्रीच्या वेळी कोणीही नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहने सरळ गडावर येतात. अशावेळी घाटरस्त्यावर अथवा गडावरील गाडीतळावर एखादी अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न शिवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

"चेकपोस्टला कुलुप होते व तेथे कोणी दिसले नाही. गेट उघडे होते म्हणून आम्ही सरळ गडावर आलो. आम्हाला खाली कोणी माहिती दिली असती तर आम्ही आलोच नसतो." गाडीतळावर आलेले तरुण-तरुणी. "गडाचे पावित्र्य राखण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने उपाययोजना करणे आवश्यक आहे. जोपर्यंत पैसे मिळतात तोपर्यंत दिवसभर चेकपोस्ट सुरू असते, रात्रीच्या वेळी मात्र एकही कर्मचारी नसतो. अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर रात्रीचे सुरक्षा कर्मचारी न नेमल्यास आम्ही याबाबत तीव्र आंदोलन करणार आहोत." महेश पवळे, अध्यक्ष, राजे शिवराय प्रतिष्ठान.

" सिंहगडाच्या घाट रस्त्यावरील कोंढणपूर फाट्यावळ चेकपोस्ट तयार करण्याचा विचार सुरू आहे. रात्रीच्या वेळी स्थानिक रहिवासी व शासकीय कर्मचारी वगळता इतर कोणालाही गडावर सोडले जाणार नाही. येत्या आठ दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल. तरुणांनीही गडाचे पावित्र्य राखण्यासाठी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे." प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com