मराठी राजभाषा दिनानिमित्त वारसा दर्शन फेरीचे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

मराठी साहित्यात अजरामर झालेले राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रजांपासून ते कुसुमाग्रजांपर्यंत अनेक साहित्यिकांची जन्म व निवासस्थळे ही खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्रे असून, त्यांना भेटी देत पुणेकरांनी त्यांचे कार्य व इतिहास बुधवारी जाणून घेतला. निमित्त होते मराठी राजभाषा दिनानिमित्त वारसा दर्शन फेरीचे.

पुणे - मराठी साहित्यात अजरामर झालेले राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रजांपासून ते कुसुमाग्रजांपर्यंत अनेक साहित्यिकांची जन्म व निवासस्थळे ही खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्रे असून, त्यांना भेटी देत पुणेकरांनी त्यांचे कार्य व इतिहास बुधवारी जाणून घेतला. निमित्त होते मराठी राजभाषा दिनानिमित्त वारसा दर्शन फेरीचे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठी राजभाषा दिनानिमित्त इतिहासप्रेमी मंडळ, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, मेहुणपुरा गणेशोत्सव मंडळ व सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजित ‘गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज’ या वारसा दर्शन फेरीचे. कसबा पेठेतील कसबा गणपती मंदिराजवळ असलेल्या गोविंदाग्रजांच्या निवासस्थानी पिंपळाचे पूजन करून सुरू झालेल्या फेरीचा समारोप सदाशिव पेठेतील कुसुमाग्रजांच्या जन्मस्थळाजवळ झाला. 

मराठी राजभाषा दिन : मराठी माध्यमातून 'यूपीएससी'ला सामोरे जाताना...

या वेळी साहित्यिका डॉ. संगीता बर्वे, प्र. के. घाणेकर, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, शाहीर हेमंतराजे मावळे, शिरीष मोहिते, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे उपविभागीय व्यवस्थापक हर्षद झोडगे, सुरेश पवार, गिरीश पोटफोडे आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्व शाळांत मराठी सक्तीची; विधानपरिषदेत विधेयक मंजूर!

त्वष्टा कासार मंडळ, निंबाळकर तालीम मंडळ, आदर्श विद्यालय मुलींची प्रशाला यांनीदेखील उपक्रमात सहभाग घेतला.

मायबोलीला विसरणार नाही...

नाट्यछटाकार दिवाकर यांच्या निवासस्थानाजवळ कार्तिक बहिरट, वेदांत कुलकर्णी यांनी टिळक व आगरकर यांच्यातील संवाद नाट्यरूपाने सादर केला. द. वा. पोतदार, नाट्यछटाकार दिवाकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासस्थानांना प्रत्यक्ष भेटी, यांसह पुणे मराठी ग्रंथालयाला जाऊन आठवणी जागविण्यात आल्या. मराठी साहित्यिकांचे निवासस्थान, कार्य आणि वैशिष्ट्यांबद्दल सामान्यांना सखोल माहिती व्हावी, याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heritage Darshan Ferri celebrates Marathi Rajbhasha Day