हेरिटेज वॉकने बारामतीकराना मिळाली नवीन माहिती

अभ्यासक राहुल देशपांडे व आशुतोष अभ्यंकर यांनी दिलेल्या माहितीमुळे बारामतीकरांना अनेक नवीन गोष्टींची आज माहिती झाली.
हेरिटेज वॉकने बारामतीकराना मिळाली नवीन माहिती

बारामती - सर्वांनाच आपला गाव, आपली संस्कृती आपल्या परंपरा याविषयी जिव्हाळा असतो पण जेव्हा याला शास्त्राची जोड मिळते तेव्हा आपल्या गावाचा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरांचा अभिमान वाटायला लागतो .

अभ्यासक राहुल देशपांडे व आशुतोष अभ्यंकर यांनी दिलेल्या माहितीमुळे बारामतीकरांना अनेक नवीन गोष्टींची आज माहिती झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सहस्रचंद्रदर्शन वर्षानिमित्त येथील भगिनी मंडळ व प्रतिबिंब युट्यूब चॅनल यांच्यावतीने बारामतीत आज (ता. 5) हेरीटेज वॉकचे आयोजन केले गेले.

ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंटचे ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, संस्थेच्या सचिव सुनंदा पवार, बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

बारामतीमधील श्री काशिविश्वेश्वर मंदिर व गुनवडी येथे भारतीय विद्या अभ्यासक राहुल देशपांडे व आशुतोष अभ्यंकर यांनी उपस्थितांना माहिती दिली. डॉ. राहुल देशपांडे यांनी मंदिर संस्कृती समजावून सांगताना मंदिर कसे पहावे, मंदिराचे विविध भाग, विविध मूर्ती यांचे शास्त्र आणि सौंदर्य उलगडून सांगितले तसेच श्री काशिविश्वेश्वर मंदिर शिवलीलामृत यांच्या नात्यावर प्रकाश टाकला. मंदिराच्या परिसरातील विविध पुरातत्वीय अवशेष व भैरवनाथ मंदिर याबाबाबत आशुतोष अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले.

गुणवडी येथे गजलक्ष्मी, गुनेश्वर मंदिर, सतिशीळा वीरगळ यांची माहिती डॉ. देशपांडे व अभ्यंकर यांनी दिली. हेरीटेज वॉकच्या संकल्पनेचे सुनेत्रा पवार यांनी स्वागत करत यापुढेही हेरीटेज वॉक सुरू रहावा यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिबिंब युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बारामतीच्या इतिहासावर उजेड टाकण्याचे काम करणाऱ्या विनोद खटके व मनोज कुंभार यांचे सुनेत्रा पवार यांनी कौतुक केले.

माजी नगराध्यक्षा जयश्री सातव, राष्ट्रवादीचे गटनेते सचिन सातव, नगरसेविका सई सातव, विद्या प्रतिष्ठानच्या सचिव ऍड. नीलीमा गुजर, विश्वस्त डॉ. राजीव शहा आदी मान्यवर उपस्थित होते. भगिनी मंडळाच्या मुख्य विश्वस्त सुनिता शहा यांनी कार्यक्रमा मागील संकल्पना विशद केली.वर्षा सिधये यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com