पुरंदर तालुक्यात मुसळधार

विजय मोरे
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पुरंदर तालुक्यात बुधवारी रात्री  झालेल्या ढग फुटीमुळे (गुरुवारी) पहाटेपासून कऱ्हानदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे.

 उंडवडी : पुरंदर तालुक्यात बुधवारी रात्री  झालेल्या ढग फुटीमुळे (गुरुवारी) पहाटेपासून कऱ्हानदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाझरे धरणातून 80 हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने कऱ्हानदी काटच्या गावाना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

बुधवारी मध्यरात्री पासून रात्री बारामती प्रशासनाकडून लाऊड स्पिकर लावून आवाहन करण्यात आले आहे.  तसेच कऱ्हानदी लगतच्या कुटूंबाना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. 
1965 नंतर कऱ्हानदीला  पहिल्यांदाच पूर आला आहे. 
जळगाव कडेपठार येथील पूल पाण्याखाली गेला असून खांडेवस्तीतील अनेक घरात नदीच्या पुराचे पाणी घुसले आहे. तीस ते पस्तीस घरे पाण्यात गेल्याने या कुटूंबाचे जनजीवन विस्कळित झाले आहे.

येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. आणखी पूराच्या पाण्याचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील कऱ्हा नदी काटच्या आंबी, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, काऱ्हाटी,फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव कप, अंजनगाव, कऱ्हावागज, बऱ्हाणपूर, नेपतवळण, मेडद तसेच बारामती शहरालगचे खंडोबानगर परिसरातील काही भागात  नदीच्या पाण्याचा धोका होण्याची  शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hevay rain in purandar taluka