नदीपात्रातील रस्ता बंदमुळे शहरात ट्रॅफिक; पुणेकरांची कोंडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

पुणे : मुसळधार कोसळणारा पाऊस आणि संत गतीने सुरु असेलेली वाहतूक यामुळे पुणेकर पुरते मेटाकुटीला आले आहे. एकीकडे नदीपात्रातील रस्ता बंद करण्यात आला आहे तर शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक संथ गतीने सुरु आहे. 

पुणे : मुसळधार कोसळणारा पाऊस आणि संत गतीने सुरु असेलेली वाहतूक यामुळे पुणेकर पुरते मेटाकुटीला आले आहे. एकीकडे नदीपात्रातील रस्ता बंद करण्यात आला आहे तर शहरातील मुख्य रस्त्यावर मात्र ट्रॅफिक जॅम झाले आहे.

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सोमवारी सायंकाळपासून मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरवात झाली असून, आज (मंगळवार) सकाळी हा विसर्ग 13 हजार 981 क्युसेकने पाणी सोडण्यात आला. त्यामुळे नदीपात्रातील डेक्कनजवळील बाबा भिडे पुल व रस्ता पाण्याखाली गेला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी नदीपात्रातील रस्ता बंद केला असून नागरिकांना नदीपात्रातून न येण्याचे आवहान केले आहे. दरम्यान शहरात सर्वच रस्त्याला संथ गतीने वाहतूक सुरु असून कित्येक रस्त्यावरील ट्रॅफिक जॅममुळे झाली आहे. यामुळे पुणेकरांची मात्र, चांगलीच कोंडी झाली आहे.

कर्वेरस्ता ते शनिवारवाडा हा रस्ता 5.3 किमीचा रस्त्यावरील अंतर पुर्ण करण्यासाठी सध्या साधारण 35 मिनिट इतका वेळ लागेल असे गुगुल मॅपवरुन दिसते आहे. म्हणजेच 10 ते 15 मिनिटाच्या रस्त्याला साधारण दुप्पट वेळ सध्या जात आहे. 

पुण्यातील या रस्त्यावर आहे वाहतूक कोंडी कोंडी.  
- शंकर शेठ रस्ता, स्वारगेट
- टिळक रस्ता, सदाशिव पेठ
- शास्त्री रस्ता, अलका टॉकीज
- कर्वे रस्ता, एंरडवणे
- सिंहगड रस्ता, दत्तवाजी
-  केळकर रस्ता  नारायण पेठ
- बाजीराव रस्ता, मंडई
- फर्ग्युसन रस्ता, शिवाजीनगर
- पुणे विद्यापीठ  रस्ता, गणेश खिंड 
- जंगली महाराज रस्ता, डेक्कन
- बंड गार्डन रस्ता
- बाणेर रस्ता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hevay traffic Jam in Pune City due to rain