भोरमध्ये प्रशासनाकडून हाय-अलर्ट; चक्रीवादळ येण्याची शक्यता

भोरमध्ये प्रशासनाकडून हाय-अलर्ट; चक्रीवादळ येण्याची शक्यता

भोर ः तालुक्यात तीन दिवसांच्या वादळी पावसानंतर गुरुवारी (ता.१५) दुपारनंतर पुन्हा चक्रीवादळ येण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने तालुक्यात हाय-अलर्ट जारी केला आहे. शासनाच्या सर्व कार्यालयीन प्रमुखांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सर्व परिस्थितीवर नजर ठेवण्यात येत आहे. अशी माहिती प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी दिली.

पावसामुळे तालुक्यातील भाटघर धरण व नीरा देवघर धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला असून दोन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु केला आहे. सद्यस्थितीत भाटघर धरणातून ५ हजार ६०० क्यूसेक्स ने तर नीरा-देवघर धरणातून ७०० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परिस्थितीनुसार हाविसर्ग वाढविण्यात येणार आहे.  त्यामुळे नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे असे प्रशासनाडून सांगण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त कोंढरी गावातील नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्याची प्रक्रीया सुरु केली 
आहे. तहसील कार्यालयात चोवीस तास आपत्ती निवारण कक्ष (दूरध्वनी क्रमांक ०२११३ २२३५३९) सुरु करण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी (ता.१४) दुपारनंतर तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे व पडझडीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.  तालुक्यात अनेक ठिकाणी भातपिकांचे नुकसान झाले, रस्ते वाहून गेले, घरांमध्ये पाणी शिरले असून काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे. तालुक्यातील उंबरे गावातून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पावसामुळे वाहून गेला, पारवडी येथील मोहन लिम्हण यांचे घर पावसामुळे  पडले, पुणे-सातारा महामार्गावरील वेळू येथील घरांमध्ये, शाळेत आणि दवाखान्यामध्ये पाणी शिरले आहे. आंबवडे खोरे, हिर्डोशी खोरे, 
वीसगाव खोरे, वेळवंड व भूतोंडे खो-यातील भातपीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हाय अलर्टमुळे तालुक्यातील माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमाअंतर्गत दुस-या टप्याचे सर्वेक्षण पुढे ढकलण्यात आले आहे. कर्नावड येथील गोविंद व वसंत कृष्णा सडांबर या शेतक-यांच्या भातपीकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागारिकांनी सतर्क राहावे, घराबाहेर पडू नये...चक्रीवादळामुळे तालुक्यात जिवीत हाणी होऊ नये यासाठी प्रशानाने सर्वतोपरी उपाययोजना केल्या असून, नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत आहे. गुरुवारी दुपारनंतर चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे 
तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील चोवीत तास 
नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com