उच्च शिक्षणात रोजगारक्षमतेवर भर

High-Education
High-Education

पुणे - उच्च शिक्षणात अधिकाधिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षमता वाढावी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने अध्ययन निष्पत्तीवर (लर्निंग आउटकम) आधारित अभ्यासक्रम बंधनकारक केले आहेत. यातील सात विषयांचे मॉडेल अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यापीठ आणि महाविद्यालयांना या विषयांची रचना करून अध्यापन करावे लागणार आहे.

तंत्रज्ञानाची प्रगती, विज्ञानाच्या विस्तारणाऱ्या शाखा आणि समाजाच्या बदलत्या गरजा, यामुळे उच्च शिक्षणाचे अंतरंग बदलण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता. त्यानुसार अभ्यासक्रमाची फेररचना करण्यात आली आहे.

आयोगाने विषयतज्ज्ञांच्या समित्या स्थापन करून त्यांच्याकडून मॉडेल अर्थात अभ्यासक्रमांचा मसुदा तयार करून घेतला. सध्या सात विषयांचे मॉडेल अभ्यासक्रम तयार केले आहेत. यात संख्याशास्त्र, हिंदी, इलेक्‍ट्रॉनिक सायन्स, बायोकेमिस्ट्री, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, पर्यावरणशास्त्र आणि मास कम्युनिकेशन अँड जर्नालिजम या विषयांचा समावेश आहे.

भाषा अभ्यासक्रमाची रचना करताना त्यात व्यावहारिक ज्ञान, रोजगारपूरक घटक, विश्‍लेषण करण्यासंबंधीचा क्षमताविकास, संभाषणकौशल्य आदी उद्देश आहे. विज्ञान विषयाची रचना करताना जागतिक स्पर्धात्मकतेबरोबरच व्यावसायिक दृष्टिकोन, प्रश्‍न सोडविण्यासंबंधी क्षमतांचा विकास, रोजगारक्षम विद्यार्थी घडविण्याचा विचार करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com