उन्हाचा चटका उद्यापर्यंत कायम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पुणे - राज्यात येत्या बुधवारपर्यंत (ता. 3) उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्‍यता आहे. येत्या गुरुवारपासून (ता. 5) मात्र सर्वदूर ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. 6) विदर्भ, मराठवाड्यात जोरदार वारे, ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने सोमवारी दिला आहे. 

मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्याची स्थिती छत्तीसगडकडे सरकली होती. उत्तर छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे सोमवारी दुपारनंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या दक्षिण भागात अंशत- आकाश ढगाळ होते. गुरुवारनंतर आठवडाभर राज्यात ढगाळ हवामानासह पाऊस पडण्यासारखी स्थिती आहे. 

विदर्भात उन्हाच्या झळा कायम आहेत. उर्वरित महाराष्ट्रात तापमानाचा पारा काहीसा वर गेला होता. राज्यात जळगाव येथे सर्वाधिक म्हणजे 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यात कमाल तापमान 38.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा यात 1.5 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. किमान तापमान 18.9 अंश सेल्सिअस होते. 

Web Title: high temperature next two days