आयर्लंडमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

Higher education opportunities in Ireland
Higher education opportunities in Ireland

पुणे : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना महागड्या शिक्षणाअभावी अमेरिका, युरोपमध्ये जाणं शक्‍य होत नसेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आयर्लंडमध्ये शिक्षणाचा पर्याय खुला आहे.

अभियांत्रिकी, विज्ञान विषयातील शिक्षणासाठी, तसेच नोकरीसाठी आयर्लंडमधील दालने खुली आहेत,'' असे "आयर्लंड'चे भारतातील वरिष्ठ शिक्षण सल्लागार बॅरी ओड्रिस्कॉल यांनी सांगितले. भारतीय विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी आयर्लंडमध्ये यावे, अशी भावनिक सादही त्यांनी घातली. 

आयर्लंडच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत तेथील शिक्षणाच्या संधीसंदर्भातील माहिती देण्यासाठी शिक्षण संस्थांचा मेळावा रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या वेळी बॅरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

""आयर्लंडमध्ये जवळपास 35 ते 40 हजार परदेशी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असून, त्यात जवळपास साडेतीन हजार भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परदेशी विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याने गेल्या काही वर्षांत या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. शिक्षणानंतर देशातच नोकरी शोधण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांना अन्य देशांच्या तुलनेत अधिक मुभा दिली जाते. विज्ञान, अभियांत्रिकी, जैव तंत्रज्ञान, जीओ सायन्स, आर्टीफिशल इंटेलिजन्स, हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी अशा विविध अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका, संशोधनपर शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे,'' असेही बॅरी यांनी नमूद केले. या वेळी आयर्लंड येथील ट्रिनिटी महाविद्यालयांच्या ग्लोबल ऑफिसर इवा पेज यादेखील या वेळी उपस्थित होत्या. 

ट्रिनिटी महाविद्यालयात पुणे आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढल्याचे इवा यांनी सांगितले. या मेळाव्यात आयर्लंडमधील जवळपास 20 विद्यापीठांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी मेळाव्याला भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com