#StampDuty मुद्रांक महसुलाची उच्चांकी  घोडदौड 

गजेंद्र बडे
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे - देशात दोन वर्षांपूर्वी झालेल्या नोटबंदीच्या वर्षात मंदावलेले मिळकतींच्या (प्रॉपर्टी) खरेदी-विक्री व्यवहारांनी यंदा गरुडझेप घेतली आहे. गेल्या आठ महिन्यांत राज्यात 13 लाख 56 हजार खरेदी व्यवहारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत मुद्रांक शुल्कातून 17 हजार 672 कोटींचा महसूल राज्य सरकारकडे जमा झाला आहे. चालू आर्थिक वर्षातील एकूण उद्दिष्टाच्या 70.68 टक्के महसूल आठ महिन्यांत मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत एक हजार 614 कोटींनी (10.05) महसुलात वाढ झाली आहे.

पुणे - देशात दोन वर्षांपूर्वी झालेल्या नोटबंदीच्या वर्षात मंदावलेले मिळकतींच्या (प्रॉपर्टी) खरेदी-विक्री व्यवहारांनी यंदा गरुडझेप घेतली आहे. गेल्या आठ महिन्यांत राज्यात 13 लाख 56 हजार खरेदी व्यवहारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत मुद्रांक शुल्कातून 17 हजार 672 कोटींचा महसूल राज्य सरकारकडे जमा झाला आहे. चालू आर्थिक वर्षातील एकूण उद्दिष्टाच्या 70.68 टक्के महसूल आठ महिन्यांत मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत एक हजार 614 कोटींनी (10.05) महसुलात वाढ झाली आहे. यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही राज्याचा मुद्रांक शुल्क विभाग महसूल जमा करण्यात पहिल्या क्रमांकावर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने मुद्रांक महसुलाचे यंदा 25 हजार कोटींचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्यापैकी साडेसतरा हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेर हाच महसूल 16 हजार 58 कोटी इतका जमा झाला होता. चालू आर्थिक वर्ष संपण्यास आणखी चार महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे या चार महिन्यांत आणखी किमान नऊ हजार कोटींचा महसूल जमा होईल, अशी अपेक्षा राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात रेडिरेकनर दर न वाढवता, "जैसे थे' ठेवले होते. या पार्श्‍वभूमीवर यंदा आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यापासूनच एखादा अपवाद वगळता मुद्रांक महसुलात सातत्याने वाढ झालेली दिसते आहे. 

गतवर्षी व यंदाचा तुलनात्मक जमा महसूल (कोटीत) 
क्र. --- महिना --- 2017 --- 2018 --- वाढ 
1) --- एप्रिल --- 1646 --- 2052 --- 406 
2) --- मे --- 1707 --- 2305 --- 598 
3) --- जून --- 2619--- 2359 --- 260 (घट) 
4) --- जुलै --- 1913 --- 2292 --- 379 
5) --- ऑगस्ट --- 1844 --- 2394 --- 550 
6) --- सप्टेंबर --- 2185 --- 2120 --- 65 (घट) 
7) --- ऑक्‍टोबर --- 1972--- 2213 --- 241 
8) --- नोव्हेंबर --- 2172 --- 1937 --- 235 (घट) 
......................................................................... 
9) --- एकूण --- 16,058 --- 17, 672 --- 1,614 
-------------------------------------------------------- 
सात वर्षांतील दस्त नोंदणी 
क्र. --- आर्थिक वर्ष --- दस्त संख्या (लाखात) 
1) --- 2012-13 --- 23 
2) --- 2013-14 --- 23.30 
3) --- 2014-15 --- 22.98 
4) --- 2015-16 --- 23.09 
5) --- 2016-17 --- 20.46 
6) --- 2017-18 --- 21.49 
7) --- 2018- नोव्हेंबरपर्यंत --- 13.56 

राज्यातील खरेदी-विक्री व्यवहारांतून मिळणारा महसूल वाढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, लोकांची मते जाणून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करणे, दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आदी प्रमुख उपाययोजना केल्या आहेत. याशिवाय, सर्वच सहकारी अधिकारी आणि कर्मचारी महसूलवाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचाच सकारात्मक परिणाम दोन वर्षांपासून दिसू लागला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही महसूल वसुलीत पहिल्या क्रमांकावर राहू, अशी अपेक्षा आहे. 
- अनिल कवडे,  नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक

Web Title: The highest scam of stamp revenue