Loksabha 2019 : वडगाव शेरी, कोथरूडमध्ये सर्वाधिक मतदार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

गेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या 18 लाख 33 हजार 794 होती. यंदा त्यामध्ये वाढ होऊन ती 20 लाख 74 हजार 861 पर्यंत गेली आहे. त्यामुळे मतदारांच्या संख्येत 2 लाख 41 हजार 67 हजाराने वाढली आहे.

पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या 18 लाख 33 हजार 794 होती. यंदा त्यामध्ये वाढ होऊन ती 20 लाख 74 हजार 861 पर्यंत गेली आहे. त्यामुळे मतदारांच्या संख्येत 2 लाख 41 हजार 67 हजाराने वाढली आहे. मतदार नोंदणीत यंदा वाढ झाली असली, तरी प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारीतही वाढ करण्याची जबाबदारी आता पुणेकरांवर आली आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. सहा मतदारसंघांपैकी वडगाव शेरीमध्ये सर्वाधिक मतदार आहेत. त्यांची संख्या 4 लाख 44 हजार 74 एवढी आहे. 

कोथरूड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 73 हजार 49 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या तीन लाख 98 हजार 966 एवढी झाली आहे, तर सर्वांत कमी म्हणजे 13 हजार 320 नवीन मतदार नोंदणी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात झाली आहे. या मतदारसंघातील मतदारांची संख्या 2 लाख 87 हजार 532 एवढी झाली आहे. गेल्या निवडणुकीत पुणे शहरात 54.24 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या वाढली असली, तरी प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारीत वाढ होणार का, पुणेकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पुणेकर ही जबाबदारी पार पडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Highest voter in Wadgaon Sheri and Kothrud