Divorce : उच्चशिक्षित दांपत्याचा पहिल्याच सुनावणीमध्ये घटस्फोट

बदलत्या जीवनशैलीमुळे जोडप्यात निर्माण झालेले वैचारिक मतभेद न मिटल्याने उच्च शिक्षित दांपत्याने संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा पहिल्याच सुनावणीमध्ये निकाली काढण्यात आला.
Divorse
DivorseSakal

पुणे - बदलत्या जीवनशैलीमुळे जोडप्यात निर्माण झालेले वैचारिक मतभेद न मिटल्याने उच्च शिक्षित दांपत्याने संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा पहिल्याच सुनावणीमध्ये निकाली काढण्यात आला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. पहाडे यांनी दावा मंजूर केला आहे.

घटस्फोट मंजूर झालेले जोडपे गेल्या दीड वर्षांपासून विभक्त राहात होते. त्यामुळे हे प्रकरण त्वरित निकाली काढण्यात आले. लक्ष्मण आणि रेश्मा (नावे बदललेली आहेत) यांचा २०२१ मध्ये विवाह झाला होता. परंतु, स्वभाव व आवडी निवडी यांच्यामुळे परस्परांमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यामुळे दोघेही सप्टेंबर २०२२ पासून विभक्त राहत होते.

या कालावधीत दोघांच्याही नातेवाईक, मित्रमंडळींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते निष्फळ ठरले. दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणातील पत्नी या वकील आहेत. तर पती हे व्यावसायिक आहेत. घटस्फोटांसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची दोघांनी पूर्तता केली आहे.

तसेच त्यांची एकमेकांकडे कशाचीही मागणी अथवा देवाणघेवाण नाही. असा युक्तिवाद अर्जदारांचे वकील ॲड. अक्षय विलास ननावरे यांनी केला. त्यांना ॲड. वैभव धनकुडे आणि ॲड. दिव्याराणी कुंजीर यांनी मदत केली.

या प्रकरणातील जोडपे गेल्या दीड वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. अर्जदार पत्नीच्या वकिली व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होऊन मोठे नुकसान होत असल्यामुळे दोघांनाही आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. हा कालावधी माफ करून घटस्फोट मंजूर केल्यामुळे दोघांच्याही वेळेची बचत झाली आहे.

- ॲड. अक्षय विलास ननावरे- अर्जदारांचे वकील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com