बारामती दूध संघाकडून सभासदांना गुड न्यूज

Milk123
Milk123

माळेगाव (पुणे) : बारामती तालुका दूध संघाने खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपया वाढ देण्याचे निश्‍चित केले आहे. ही दरवाढ 16 ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे. यापुढे दूध उत्पादकांना प्रतिलिटर 28 रुपये दर मिळणार आहेत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी स्पष्ट केली.

बारामती तालुका सहकारी दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखाली पार पडली होती. त्या सभेत पवार यांनी संघाकडून दरवाढ करण्याबाबत सूतोवाच केले होते. त्या पार्श्वभूमीचा विचार करून संघाच्या संचालक मंडळाने एक रुपया प्रतिलिटर दूध दरवाढ करण्याचे जाहीर केले. त्यासंबंधी माहिती देताना संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र रायकर पत्रकारांशी बोलत होते.
संदीप जगताप म्हणाले, ""बारामती तालुक्‍यात विशेषतः जिरायती भागात अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची अद्याप टंचाई आहे. जनावरांचा चाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यानुसार छावण्यांच्या माध्यमातून शेतकरी आपले पशुधन जगविताना प्रयत्न करीत आहेत. अशा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळावा, या उद्देशाने संघाने केलेली दूध दरवाढ आर्थिकदृष्ट्या जमेची ठरणार आहे.''

बारामती संघाचे सध्या प्रतिदिनी 2 लाख 10 हजार लिटर दूध संकलन होत आहे. दुष्काळी स्थिती डोळ्यासमोर ठेवून संघ प्रशासनाने तालुक्‍यात वेळीच मुरघास प्रकल्प यशस्वीरीत्या राबविला व छावणीच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केल्याने वरील दुधाचे संकलन टिकविणे सोपे झाले. सध्या संघाकडून तालुक्‍यात पळशी व जळगाव सुपे येथे जनावरांसाठी चारा छावणी चालविली जात आहे. पळशी येथे 900, तर जळगाव सुपे येथे 1300 जनावरे या योजनेचा लाभ घेत आहेत.
- डॉ. सचिन ढोपे, व्यवस्थापकीय संचालक, बारामती तालुका दूध संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com