शहरात 'तकरीर' मुशायराचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

सकस आणि मधुर शब्दांनी विणलेले काव्य मैफिलीत रसिकांना अनुभवयाला मिळणार आहे.

पुणे - हिंदी आणि उर्दू कविता, नज्म, गझल, गीत यांचा सुरेख संगम साधलेला एक आगळा वेगळा कार्यक्रम मुशायरा लवकरच शहरात रंगणार आहे. शहरातील काही नव्या दमाचे कवी पत्रकार भवन, नवी पेठ येथे उद्या 30 जून ला हा कार्यक्रम सादर करणार आहेत. 

सुखनजादे या हिंदी आणि उर्दू कवितांना सादर करणाऱ्या ग्रुपकडून 'तकरीर' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिथे पुण्यातील काही युवा कवी सत्यम श्रीवास्तव, अल्ताफ कलंदर, शैलेश वंजारा, संकेत सुळे, प्रणव जोशी, प्रथम गिरिधारी आणि पाहुणे कलाकार आरोही श्रीवास्तव, गजानन मिटके, कमलेश बिस्वास, आनंद सिंग, विरेन्द्र पाटील हे आपले गीत, गझल आणि कविता आपल्यासमोर प्रस्तुत करतील. सकस आणि मधुर शब्दांनी विणलेले काव्य मैफिलीत रसिकांना अनुभवयाला मिळणार आहे. सादर होणाऱ्या कविता वीर रस, हास्य रस, शृंगार रस आदी बांधणीतल्या आहेत. सायंकाळी 6 ते 9 या वेळेत कार्यक्रम पार पडेल. या कार्यक्रमासाठी तिकीट उपलब्ध करून घेण्यासाठी आपण या वेबसाईट वर संपर्क करु शकता. -  http://go.eventshigh.com/qgl7m 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Hindi And Urdu Taqrir Poem Mushayra Program In Pune