पुण्यात रंगणार हिंदी आणि उर्दू युवा कवींचा कार्यक्रम 'मुशायरा'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

सकस आणि मधुर शब्दांनी विणलेले हे उत्कट नाते या मैफिलीत काव्य रसिकांना अनुभवयाला मिळणार आहे. सादर होणाऱ्या कविता वीर रस, हास्य रस, शृंगार रस आदी बांधणीतल्या आहेत.

पुणे - हिंदी आणि उर्दू कविता, नज्म, गझल, गीत यांचा सुरेख संगम साधलेला एक आगळा वेगळा कार्यक्रम 'मुशायरा' लवकरच शहरात रंगणार आहे. शहरातील काही नामवंत आणि नव्या दमाचे कवी कलासीएम सभागृह, कर्वे नगर येथे येत्या 8 एप्रिल ला हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला हिंदी आणि उर्दू भाषांनी नेहमीच भुरळ घातली आहे. अनेक नामवंत कवी जसे दुष्यन्त कुमार, रामधारी सिंह दिनकर, हरिवंशराय बच्चन, फैझ अहेमद फैझ आदींच्या रचना अनेक काव्यरसिक आवर्जून वाचतात. यांचीच परंपरा पुढे घेऊन जाणारा हा कार्यक्रम आहे. नामवंत कवी मुन्नावर राणा आपल्या या ओळींमध्ये असे म्हणतात की, हिंदी आणि उर्दूचं नातं सख्या बहिणी सारखे आहे.
"सगी बहनो का रिश्ता है, जो उर्दू और हिंदी मे, कही दुनिया के दो जिंदा जुबानो मे नही दिखता"...

सकस आणि मधुर शब्दांनी विणलेले हे उत्कट नाते या मैफिलीत काव्य रसिकांना अनुभवयाला मिळणार आहे. सादर होणाऱ्या कविता वीर रस, हास्य रस, शृंगार रस आदी बांधणीतल्या आहेत. ज्या प्रेम, मानवता, देशभक्ती, निसर्ग आणि अशा अनेक पैलूंवर बोलतात. याच विचारांना मार्ग देत पुण्यातील कवी तरुणांतर्फे आयोजित सुंदर आणि बोधदायक सुरवात मुशायराच्या माध्यमातून केली गेली आहे. तुम्हीपण या आगळ्या-वेगळ्या, शब्दरूपी शिक्षा देणाऱ्या कार्यक्रमाचे प्रेक्षक होऊ शकता. जिथे पुण्यातील काही निवडक युवा कवी, कमलेश बिस्वास सोबत रविंदर सिंग, अयान शुक्ल, सत्यम श्रीवास्तव, आनंद सिंग, वैभव गुप्ता, प्रथम गिरिधारी आणि जव्वाद सय्यद आपले गीत, गझल एवं कविता आपल्यासमोर प्रस्तुत करतील. हा कार्यक्रम कर्वे नगर येथे कलासीएम आर्ट गॅलरीत 8 एप्रिल ला सायंकाळी 6:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी तिकीट उपलब्ध करून घेण्यासाठी आपण या वेबसाईट वर भेट देऊ शकता. -  http://go.eventshigh.com/cpyce

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Hindi and Urdu Youth Poets Mushayra in Pune