शाल पांघरून हिंदुत्त्व दाखविण्याची आम्हाला गरज नाही : देवेंद्र फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

devendrs fadanvis

आम्हाला शाल पांघरुन हिंदुत्त्व दाखवायची गरज नाही: फडणवीस

पुणे : ‘‘शाल पांघरून हिंदुत्त्वाची दाखविण्याची आम्हाला गरज नाही, कारण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या रक्तातच हिंदुत्त्व आहे. हिंदुत्व हा शाश्वत विचार असून तो विचार प्रत्यक्षात आणणारी यंत्रणा म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. आत्मभान राखून आत्मतेजाद्वारे समाज विकसित करण्याची आमची भूमिका आहे,’’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.

लेखक शांतनू गुप्ता यांनी लिहिलेल्या आणि मल्हार पांडे यांनी अनुवादित केलेल्या 'भाजप काल आज आणि उद्या' या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राम सातपुते आणि प्रशांत परिचारक, गुप्ता, पांडे, कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे संचालक ऋतुपर्ण कुलकर्णी, अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘ भाजपचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यातील दिशा आणि विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची मदत होईल. हिंदूत्त्व हा शाश्वत विचार नष्ट कसा होईल, यासाठीच भारतावर परकीयांचे हल्ले झाले असून आपल्या आत्मभानाचे आणि आत्मविश्वासाचे असलेली प्रतिके म्हणजे अयोध्येतील राम मंदिर, कृष्णजन्मभूमी, काशीविश्वेश्वर मंदिर आणि सोमनाथ मंदिर ही केंद्रे लक्ष्य केली गेली. हिंदुत्वाचा हा विचार क्षीण होऊ नये यासाठीच हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आणि सावरकरांनी अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून हा विचार जोपासला. भारताला आगामी काळात विश्वगुरू व्हायचे म्हणजे जगावर राज्य करायचे आहे, असा त्याचा अर्थ होत नसून एक शाश्वत विचार आणि विकास विश्वगुरूच्या भूमिकेतून मांडायचा आहे.’’

चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदुत्वाच्या विचारधारेवर वाटचाल करणारा भाजप हा केवळ 1980 मध्ये स्थापन झालेला राष्ट्रीय पक्ष नसून याला पाच हजार वर्षांचा पुरातन इतिहास लाभलेला आहे. त्यामुळे आमच्यामुळे भाजप ग्रामीण भागात दारोदारी पोहोचला अशा गमजा किंवा फुशारक्या मारणा-यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. हिंदू विचार हा केवळ कर्मकांडांशी जोडलेला नसून संस्कृती आणि संस्कारांशी जोडलेला आहे.

यावेळी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. गुप्ता यांनी पुस्तक लेखनामागची भूमिका विशद केली. पांडे यांनी पुस्तक अनुवादाची प्रक्रीया उलगडून सांगितली. आरती कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मंजिरी शहाणे यांनी सूत्रसंचालन केले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असून त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था काय, असे फडणवीस यांना कार्यक्रमानंतर विचारले असता, राज्य सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारची ती जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच शाल पांघरण्याचा टोला कोणाला होता, असे विचारल्यावर, ज्यांना समजायचे असेल त्यांना समजेल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Hindutva Wearing Shawl Hindutva Eternal Idea Mechanism Makes Idea Reality Bharatiya Janata Party Devendra Fadnavis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..