हिंदुत्व कोणाच्या मालकीचा शब्द नाही : रामदास फुटाणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

पुणे : ''हिंदुत्व कोणाच्या मालकीचा शब्द नाही. काँग्रेसचे हिंदुत्व वारकऱ्यांसाठीचे आहे. काँग्रेसच्या विचाराने देश जोडला जाईल. त्यामुळे राजीव गांधी यांच्या सारख्या पंतप्रधानाची देशाला गरज आहे." असे मत, वात्रटिकाकार व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केेले.

अभिनेत्री निर्मिती सावंत यांना रामदास फुटाणे यांच्या हस्ते राजीव गांधी कला गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. राजीव गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ वसंतदादा सेवा संस्था व प्रियांका महिला उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, वसंतदादा सेवा संस्थेेेचे अध्यक्ष संजय बालगुडे, प्रियांका महिला उद्योगच्या अध्यक्षा संजीवनी बालगुडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे उपस्थित होते. यावेळी उल्हास पवार म्हणाले, "आपल्याला विस्मृतीनेे पछाडले आहे. अनेक महान व्यक्तींचे कार्य आपण विसरतो. राजीव गांधी यांनी अनेक कामे केली. ते अतिशय संवेदनशील पंतप्रधान होते.

निर्मिती सावंत म्हणाल्या," राजकीय व्यक्तीच्या नावाने पहिलाच पुरस्कार स्वीकारत आहे. त्याचे कारण म्हणजे राजीव गांधी हे आवडतेे व्यक्तिमत्व होते."

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindutva word is not own by anyone : Ramdas Futane