हिंगणवेढ्यात बिबट्याने केला पाळीव कुत्र्यांवर हल्ला

दिनेश गोगी
बुधवार, 26 डिसेंबर 2018

एकलहरे :  हिंगणवेढे शिवारात सध्या बिबट्याचा वावर दिवसा ढवळ्या नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. एकलहरे- हिंगणवेढे (राख बंधारा परिसर) शिवरस्त्यालगत मळ्यांमध्ये शेतकरी वस्ती करुन राहतात.  आजुबाजुला उसाचे क्षेत्र भरपुर असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते.या परिसरात गेल्या वर्षभरापासुन बिबट्याची मादी व तिन बछडे यांचा संचार असुन या बिबट्या मादीने आतापर्यंत अनेक कुत्रे, बकरे, वासरे फस्त केले आहेत. येथील नागरिकांनी वनविभागाकडे वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करुनही अजुनही पिंजरा लावण्यात आला नाही. अशी नागरिकांची तक्रार आहे.

येथील रहिवाशी साहेबराव धात्रक यांच्या दोन पाळीव कुत्र्यांवर मंगळवारी (दि.२५) रात्री ९ वाजेदरम्यान बिबट्याने हल्ला करुन ओढुन नेले. मात्र नागरिकांनी बँटऱ्यांच्या प्रकाशात दगड गोटे भिरकावल्याने जखमी कुत्र्याला सोडुन बिबट्याने उसामध्ये पलायन केले. कुत्र्याच्या गळ्यात लोखंडी अनकुचीदार पट्टा असल्याने कुत्र्याचा जीव वाचला. मात्र त्याच्या अंगावर व गळ्याभोवती अनेक ठिकाणी बिबट्याच्या दातांच्या जखमा झाल्या.
आतापर्यंत या बिबट्याने रामकिसन गणपत मोरे यांची शेळी, अशोक तुकाराम धात्रक यांची गाय, यमाजी नामदेव नागरे, भारत पुंजा पवळे, संतोष सुरेश धात्रक (उपसरपंच) यांचे कुत्रे, जयराम पंढरीनाथ राजोळे व शरद कारभारी राजोळे यांचे कुत्रे व वासरु फस्त केले आहे.

या परिसरात भारत पवळे, दिलीप पवळे, यमाजी नागरे, रतन धात्रक, भाऊसाहेब वाघ, गंगाधर धात्रक, साहेबराव धात्रक यांच्यासह अनेक कुटुंबे मळ्यांमधुन वास्तव्यास आहेत.यातील लहान मोठ्यांचा वावर या एकाच रस्त्याने होतो. सध्या सर्वत्र उसतोड झाली आहे. गावात फक्त एक दोन ठिकाणी शेतात उस ऊभा आहे.या ठिकाणीच बिबट्यामादी व तिच्या तीन पिलांचा मुक्काम आहे. आतापर्यंत कुत्रे, गाय, वासरु यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.मात्र या बिबट्याने माणसांवर हल्ला करण्यापूर्वी येथे वनविभागाने पिंजरा लावावा अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.

''राखेच्या बंधाऱ्यात अनेक ठिकाणी बाभूळ व इतर झाड झुडपांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याला लपण्यास जागा असल्यानेबिबट्याचा वावर गेल्या २-३ वर्षांपासून कायम आहे. या दहशतीपासून वन विभागाने सुटका करावी.''
- रतन धात्रक(शेतकरी)
 
Web Title: In Hingange, leopard attack on two Pet dogs