हिंजवडी : मेट्रोचे काम आठ दिवसात सुरु न झाल्यास बापटांचा आंदोलनाचा इशारा

मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असून संबंधित मेट्रो नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यास भविष्यकाळात त्यावर अतिरिक्त खर्च करावा लागेल
हिंजवडी : मेट्रोचे काम आठ दिवसात सुरु न झाल्यास बापटांचा आंदोलनाचा इशारा
हिंजवडी : मेट्रोचे काम आठ दिवसात सुरु न झाल्यास बापटांचा आंदोलनाचा इशाराsakal

हिंजवडी (पुणे) : हिंजवडी आयटी नगरी, पुणे व पिंपरी चिंचवड शहराला जोडणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर प्रस्तावित मेट्रो मार्गाचे काम नियोजित काळात पुर्ण झाले नाही तर याविरुद्ध आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन खासदार गिरीश बापट यांनी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांना दिले.गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा मेट्रोमार्ग नियोजित वेळेत पूर्ण होणे शक्य नाही व या मार्गासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असून संबंधित मेट्रो नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यास भविष्यकाळात त्यावर अतिरिक्त खर्च करावा लागेल ही शक्यता नाकारता येत नाही.

याचा नकळत आर्थिक भार हा पुणेकर जनतेला व सरकारला सोसावा लागणार आहे ही बाब गंभीर असून हा मार्ग सुरु होण्यास विलंब होत असल्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचा झालेला आहे.त्यामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.हा मार्ग पुणे, पिंपरी-चिंचवड मधील नागरिक व आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका देणारा असल्यामुळे या मार्गाचे काम ज्या ९८ % जागा ताब्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी तातडीने सुरू करावे तसेच ज्या उर्वरित सरकारच्या जागा ताब्यात आलेल्या नाहीत. त्या तातडीने ताब्यात घेणेबाबत प्रशासनाने लक्ष देऊन कार्यवाही करावी. जेणे करुन सदरचा प्रस्तावित मेट्रो मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.

हिंजवडी : मेट्रोचे काम आठ दिवसात सुरु न झाल्यास बापटांचा आंदोलनाचा इशारा
सावध व्हा, मुंबईत कोरोनानंतर मुलांना 'या' आजाराची लागण... 

तरी ज्या ९८ % जागा ताब्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी तातडीने काम सुरू करावे.तसेच या मार्गावर ज्या उर्वरित सरकाच्या जागा ताब्यात आलेल्या नाहीत त्या तातडीने ताब्यात घेणयाबाबत कार्यवाही करुन पुढील आठ दिवसात काम सुरु न झाल्यास नजीकच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करावे लागेल असे खासदार बापट यांनी नमूद केले आहे.याप्रसंगी आमदार सिध्दार्थ शिरोळे, उपमहापौर सुनिता वाडेकर, प्रभाग समिती अध्यक्षा स्वप्नाली सायकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, अमोल बालवडकर,ज्योती कळमकर, निलीमा खाडे, आदित्य माळवे, प्रल्हाद सायकर इत्यादी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com