शिरीष कुलकर्णी यांच्या पोलिस कोठडीत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पुण - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी कंपनीच्या आर्थिक व्यवहारात अपहार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले डी. एस. कुलकर्णी यांचे पुत्र शिरीष कुलकर्णी यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

पुण - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी कंपनीच्या आर्थिक व्यवहारात अपहार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले डी. एस. कुलकर्णी यांचे पुत्र शिरीष कुलकर्णी यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

कुलकर्णी यांची 7 दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने सोमवारी त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश डी. जी. मुरुमकर यांच्या न्यायालयाने त्यांना 5 जुलैपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावली आहे. 7 दिवसांच्या पोलिस कोठडीदरम्यान कुलकर्णी यांच्या बॅंक खात्यावर 143 कोटी रुपये हस्तांतरित झाले असून, त्याबाबत सखोल तपास करणे आवश्‍यक आहे. तसेच, इतर आर्थिक व्यवहारांच्या आणि आरोपींच्या या प्रकरणातील सहभागाबाबतही कुलकर्णी पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने पोलिस कोठडीत वाढ आवश्‍यक असल्याचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयाला सांगितले. तर, शिरीष कुलकर्णी कंपनीच्या अध्यक्षपदी असताना हा अपहार झाला नसल्याने त्यांचा या व्यवहाराशी संबंध नाही. तसेच, या प्रकरणातील आरोपपत्र मार्च 2018 मध्येच दाखल झाले असून, यासंबंधातील न्यायवैधक लेखापरीक्षण अहवालही न्यायालयासमोर सादर झाला आहे व त्यात कुलकर्णी यांचा सहभाग दिसून येत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील सुशीलकुमार पिसे यांनी केला. दरम्यान, डी.एस.के. कंपनीचे अधिकारी सुनील घाटपांडे आणि राजीव नेवासकर यांच्या जामीन अर्जावर 5 जुलैला सुनावणी होणार आहे. 

Web Title: hirish Kulkarni's police custody extended