हातावर चालत त्याने केली पुरंदर किल्ल्यावर यशस्वी चढाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे : 'मेक माय ड्रीम फाऊंडेशन' या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेने किल्ले पुरंदर येथे ट्रेक आयोजित केला होता. अकरा दिव्यांगांनी यशस्वीरित्या हा ट्रेक पूर्ण केला.  यातील आकाश दसगुडे, पवन झांबरे, सुरेश राठोड व सागर भारत या चौघांनी कॅलीपर व क्रचेसच्या सहाय्याने केवळ दीड तासात किल्ला सर केला. विशेष म्हणजे आकाश पवार या कमरेखालचा भाग नसलेल्या मुलाने जिद्दीने कोणाच्याही मदतीशिवाय हातावर चालत दोनतासात चढाई केली. त्याने यापूर्वी संस्थेने आयोजित केलेल्या पर्वती, राजमाची किल्ला, सिंहगड किल्ला या मोहिमेत सहभाग घेतला होता.
 

पुणे : 'मेक माय ड्रीम फाऊंडेशन' या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेने किल्ले पुरंदर येथे ट्रेक आयोजित केला होता. अकरा दिव्यांगांनी यशस्वीरित्या हा ट्रेक पूर्ण केला.  यातील आकाश दसगुडे, पवन झांबरे, सुरेश राठोड व सागर भारत या चौघांनी कॅलीपर व क्रचेसच्या सहाय्याने केवळ दीड तासात किल्ला सर केला.

विशेष म्हणजे आकाश पवार या कमरेखालचा भाग नसलेल्या मुलाने जिद्दीने कोणाच्याही मदतीशिवाय हातावर चालत दोनतासात चढाई केली. त्याने यापूर्वी संस्थेने आयोजित केलेल्या पर्वती, राजमाची किल्ला, सिंहगड किल्ला या मोहिमेत सहभाग घेतला होता.
journey
कल्याणी काळे या वक्र मणकाग्रस्त मुलीने आयुष्यात पहिल्यांदाच ट्रेक केला. पाठदुखीवर मात करत तिने जिद्दीने हा ट्रेक पूर्ण केला. दिक्षा साबळे हिच्या शरीराची उजवी बाजू अर्धांगवायूग्रस्त असून इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षात शिकत आहे. तीसुध्दा या ट्रेकमध्ये उत्साहाने सहभागी झाली होती. रंगनाथ गाडेकर या विद्यार्थ्याची दोन्ही पाऊले पूर्ण उलट असूनही त्यानेही वाटेतील दगडगोटे खाचखळगे कशाचाही बाऊ न करता अतिशय सहजपणे ट्रेक पूर्ण केला.

याशिवाय सायली इंगळे, जयनारायण महतो, निलेश वारकरी या मुलांनी स्वतःची काळजी घेत इतर मुलांचे सामान घेऊन मदत केली. या मुलांना मार्गदर्शनासाठी व ट्रेकच्या नियोजनासाठी संस्थेच्या वतीने मेधा कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, गजानन कुलकर्णी, सविता आठवले यांनी संयोजन केले.
स्वरूपवर्धिनी पुणे या संस्थेकडून रोहित ठाकूर, शेखर चव्हाण, प्रणव ढमाले व सत्यम तांबडे या महाविद्यालयीन तरुणांनी अत्यंत उत्साहाने सहभागी होऊन मुलांची काळजी घेतली व भरपूर मनोरंजन केले.विद्या कुलकर्णी, मनिषा घोडके या स्वयंसेवकांची उत्स्फूर्त मदत झाली. विश्वास पाटणकर या गिर्यारोहणात अनुभवी स्वयंसेवकाने ट्रेकच्या नियोजनापासून ट्रेक निर्वेध पार पाडण्यासाठी आवश्यक सहकार्य केले.
purandar trek
मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, ''या ट्रेकचा मुख्य उद्देश, मुलांचे अस्तित्व जनमानसात पोहोचवावे, असंख्य अडचणींवर मात करून ही मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे होते. ही मुले समाजातील अव्यंग लोकांना प्रेरणा देण्यात यशस्वी झाली. आकाश पवारकडून प्रेरणा घेऊन एक मध्यमवयीन बाई अर्ध्या रस्त्यात परत चाललेल्या उलट फिरून ट्रेक पूर्ण केला. कित्येक लोकांनी वाटेत थांबून मुलांना सलामी दिली. काही जणांनी मुलांची माहिती घेऊन त्यांना दाद दिली व उत्साह वाढवला.''

Web Title: On his hand he succeeded trekking at Purandar Fort