द्रुतगती मार्गावरील ऐतिहासिक अमृतांजन पूल होणार नामशेष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

अमृतांजन बामवरुन पडले अमृतांजन पुलाचे नाव 
मुंबई, कोकण आणि घाटामाथा जोडण्यासाठी १८९ वर्षांपूर्वी अमृतांजन पुलाची उभारणी केली. बोरघाटातील या पुलावर अमृतांजन बामची जाहिरात झाल्याने या पुलाला अमृतांजन हे नाव पडले आणि तीच पुढे त्याची ओळख झाली.
 

लोणावळा : द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील (बोरघाट) वाहतूक कोंडी, अपघातांना निमंत्रण देणारा १८९ वर्षे जुना ऐतिहासिक अमृतांजन पुल तांत्रिक दृष्ट्या गैरसोयीचा ठरत आहे. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगतीवरील वाहतूक घाटात सुरळीत राखण्याच्या हेतूने रस्ते विकास महामंडळाच्यावतीने अमृतांजन पूल पाडण्याच्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

सदर पुल पाडण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्यावतीने निवीदा प्रकियेस सुरवात झाली आहे. सध्या गैरसोयी ठरणारा अमृतांजन पुल पाडण्यासाठी दोन वर्षांपूर्वी नागरिकांच्या सूचना, हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यावेळी २४ हरकती आल्या होत्या. रस्ते विकास महामंडळाच्या वतीने समितीही नियुक्त करण्यात आली होती. सदर पुलास 'हेरिटेज दर्जा' देत हा ऐतिहासिक ठेवा असल्याने तो जतन करावा व अपघात, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पर्यायी मार्ग काढण्यात यावा अशा सूचना नागरिकांनी केल्या होत्या. रेल्वेकडेही याबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यास रेल्वेने प्रतिसाद दिला नाही.  मात्र रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सदर पुल पाडण्यासाठी निवीदा मागविण्यात आल्याने ब्रिटीशांनी सन १९३० मध्ये बांधण्यात आलेला अमृतांजन पुल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 
amrutanjan pul
अमृतांजन पुलाजवळ राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्ग एकत्र येतात. सदर मार्गाची आखणी झाल्यानंतर याठिकाणी पुलाच्या रचनेमुळे हा पूल तांत्रिकदृष्ट्या गैरसोयीचा ठरत असल्याचे चित्र आहे. खंडाळा घाटात बोगद्याच्या पुढे आल्यावर अचानक येणारा तीव्र उतार व वळण यामुळे वाहनचालकांना वेगावर नियंत्रण राखता येत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. अमृतांजन पुलाजवळ अपघातांची मालीका सुरूच असून सरासरी रोज एक अपघात घडत आहे. याठिकाणी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मुंबई बाजूकडून घाट चढताना अमृतांजन पुलाजवळ तीव्र चढण व वळण असल्याने वाहतूक कोंडी नित्याची होत आहे. 

bridge
अमृतांजन बामवरुन पडले अमृतांजन पुलाचे नाव 
मुंबई, कोकण आणि घाटामाथा जोडण्यासाठी १८९ वर्षांपूर्वी अमृतांजन पुलाची उभारणी केली. बोरघाटातील या पुलावर अमृतांजन बामची जाहिरात झाल्याने या पुलाला अमृतांजन हे नाव पडले आणि तीच पुढे त्याची ओळख झाली.

पर्यटकांचे आकर्षण
द्रुतगती मार्गाची उभारणी करताना त्याला समांतर दुसरा पूल बांधण्यात आला आहे. पर्यटकांसाठी हा पूल आकर्षणाचे केंद्र आहे. पुलावर उभे राहिले असता खंडाळा घाटातील नागमोडी वळणे, ड्युक्स नोज, नागफणीचा सूळका, बोगद्यांतून बाहेर पडणारी रेल्वे गाडी आदींचे दर्शन होते. पावसाळ्यात दाट धुके निसर्गरम्य खंडाळा घाटातील विहंगम दृश्य पाहायला मिळत असल्याने येथे पर्यटकांचा ओढा असतो. 

 

Web Title: The historic 'Amrutanjan bridge' on the way to extinction