ताजमहालाचा ऐतिहासिक दस्तऐवज पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

पुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला होता. हा ताबा लष्कराकडे असावा की मुलकी प्रशासनाकडे, या संदर्भात पत्रव्यवहार झाले. या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या छायाप्रतींचे जतन पुण्यात होत आहे. 

पुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला होता. हा ताबा लष्कराकडे असावा की मुलकी प्रशासनाकडे, या संदर्भात पत्रव्यवहार झाले. या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या छायाप्रतींचे जतन पुण्यात होत आहे. 

दस्तऐवजांमध्ये पाच पत्रव्यहार आहेत. ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न ब्रिटनच्या तत्कालीन राजघराण्याकडे गेला होता. त्यावर चर्चा झाल्यानंतर हा ताबा लष्कराकडे असावा, असा निर्णय त्यांनी दिला. नंतर ब्रिटन अधिकारी कर्नल क्‍लेअर यांनी 6 ऑगस्ट 1806 मध्ये तसे पत्र लष्करी सचिव गॅट लेक यांना पाठविले आणि ताबा लष्कराकडे राहिला. ही घटना तिसऱ्या जॉर्जच्या काळात घडल्याचे सांगितले जाते. 

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी या दस्तऐवजांच्या छायाप्रती खडकी येथील संरक्षण दलाच्या जतन आणि संशोधन केंद्राला भेट दिल्या आहेत. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ताजमहालचा ताबा हस्तांतरित करण्यात आला. आता त्याचे जतन आणि देखरेख पुरातत्त्व विभाग करीत आहे. मी इतिहासाचा विद्यार्थी असल्याने या कागदपत्रांबाबत मला कुतूहल होते. म्हणूनच त्यांच्या छायाप्रती मी जपून ठेवल्या होत्या. मी पुण्यात कार्यरत असल्याने या शहराशी नाते जुळले आहे. त्यामुळे दस्तऐवजांच्या छायाप्रती खडकीतील जतन केंद्राला भेट दिल्या आहेत. दिल्लीबरोबर पुण्यातही या प्रती असतील, याचा आनंद आहे, असे डॉ. यादव यांनी सांगितले. 

आग्रा येथे संरक्षण संपदा अधिकारी म्हणून काम करताना ही कागदपत्रे आढळली. मी आणखी कागदपत्रे शोधली. 2013 मध्ये ही कागदपत्रे दिल्लीतील पुरालेखागाराकडे पाठविली; परंतु माझ्यासाठी त्याच्या छायाप्रती करून घेतल्या. त्या आता खडकीतील जतन केंद्राला दिल्या आहेत. 
- डॉ. डी. एन. यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड

Web Title: Historic documents about Taj Mahal in Pune