फिल्म इन्स्टिट्यूटचे ऐतिहासिक महत्त्व (व्हिडिओ)

फिल्म इन्स्टिट्यूटचे ऐतिहासिक महत्त्व (व्हिडिओ)

पुणे - नदी किंवा तलावाकाठच्या पायऱ्या. आजूबाजूला मोठे वृक्ष. एका भिंतीवर जुन्या काळातली वाटणारी शिल्पं. एका बाजूला गुहेसारखं काहीतरी. मोठा तलाव, पण कोरडा. हवं तेव्हा पाण्यानं तो भरतात, हवा तेव्हा रिकामा करतात. नितीन पत्की सांगत होते, ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’च्या या जागेत अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे. बालकलावंतांना ही जागा प्रचंड आवडते.’ 

या जागी ऐतिहासिक महत्त्व असलेला ‘प्रभात’ चित्रपट स्टुडिओ होता. आता इथं असलेल्या ‘एफटीआयआय’मध्ये देशभरातून अनेक तरुण चित्रपट व मालिकांसाठी कथा, पटकथा, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण, दिग्दर्शन वगैरेचं शिक्षण घ्यायला येतात. आपल्या चित्रपटसृष्टीतले कित्येक प्रसिद्ध दिग्दर्शक व इतर तंत्रज्ञ इथं शिकले आहेत. 

इथल्या कला विभागात फेरफटका मारला. तिथलं खरं वाटणारं खेड्यातलं घर खोटं-खोटं आहे हे, तिथल्या दादा आणि ताईंनी सांगितलं. त्याच्या जवळचा शहरातला फ्लॅटही खोटाच उभारला असल्याचं त्यांनी सांगितलं. वर पाहिलं तर बऱ्याचशा लाकडी दांड्या आडव्या टाकलेल्या होत्या. त्यावरून प्रकाशव्यवस्था केली जाते, दिवे खाली-वर केले जातात. एका ट्रॉलीवर कॅमेरा ठेवून छायाचित्रकार आणि दिग्दर्शक त्यावर बसतात. ट्रॉली इकडून तिकडे फिरवत चित्रीकरण होतं. 

जयसिंग मापारे यांनी एकोणीसशे अडतीसपासून आजपर्यंत काम करत असलेल्या ‘मिचेल’ या कॅमेऱ्याची वैशिष्ट्यं सांगितली. यातून ‘कुंकू,’ ‘शेजारी,’ ‘माणूस’ व ‘गोपाळकृष्ण’ या गाजलेल्या मराठी चित्रपटांचं चित्रीकरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नीता तुपारे आंब्याच्या एका झाडाखाली बसून म्हणाल्या, ‘‘याला विजडम ट्री म्हणून नाव मिळालं आहे, कारण इथल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसल्यावर नवनवीन कल्पना सुचतात. बहुतेक हा वातावरणाचा परिणाम असावा. प्रकाशदादा व रेवतीताईंनी इथल्या कम्युनिटी रेडिओ सेंटरवर अनेक मुलं कला सादर करायला येतात हे आवर्जून सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com