ऐतिहासिक नाणेघाट परिसरात नागरिकांच्या पाण्यासाठी दाहीदिशा

दत्ता म्हसकर
मंगळवार, 22 मे 2018

जुन्नर (पुणे) : ऐतिहासिक नाणेघाट परिसरातील सुमारे एक हजार लोकवस्तीला पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे.
घाटघर गावासह लव्हाळे वस्ती, नाणेघाट वस्ती, अडुळशी येथे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. विहिरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. फडके तलाव परिसरात ओढ्याच्या पात्रात खड्डे (डवरे) घेऊन वाटी वतीने पाणी गोळा करण्याची वेळ आली आहे. पाणी मिळविण्यासाठी कुटूंबातील सदस्यांचा वेळ खर्च होत आहे. सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतराहून पाणी वाहून आणावे लागत आहे.

घाटघरच्या पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती केली. नळ कोंढाळी केली आज-उद्या पाणी येईल घोषणा झाली पण पाणी काही आले नसल्याचे सांगण्यात आले. येथील विंधन विहिरीचा हातपंप नादुरुस्त झाल्याने टंचाईत भर पडली आहे. नागरिकांची टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी असली तरी प्रस्ताव न केल्याने टँकर कधी मिळणार हा ही प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Web Title: historic naneghat place citizen faces water problem