पुणे : होर्डिंगप्रकरणी रेल्वे प्रशासनाचीच चूक 

4Make_Pune_Safe_0.jpg
4Make_Pune_Safe_0.jpg

पुणे : होर्डिंगचा सांगाडा उतरविताना आवश्‍यक उपाययोजना व काळजी घेण्यात आली नाही, परिणामी होर्डिंग कोसळून चार जणांना आपला जीव गमवावा लागला. हा अपघात रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळेच घडला असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. दरम्यान, या प्रकरणात दोषी असलेल्या मात्र पळून गेलेल्या आरोपींना दोन दिवसांत अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
 
#makepunesafe शाहीर अमर शेख चौकातील रेल्वेच्या हद्दीत असलेल्या होर्डिंगचा सांगाडा उतरविताना शुक्रवारी दुपारी सांगाडा कोसळून झालेल्या अपघातात रिक्षाचालकांचा मृत्यू झाला; तर अनेक जण जखमी झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी शनिवारी रेल्वेचा कनिष्ठ अभियंता संजयसिंह विष्णूदेवसिंह व लोहार ग्रेड दोन पांडुरंग निवृत्ती वनारे या दोघांना अटक केली होती. ठेकेदार व कामगार मात्र घटनेनंतर पळून गेला. 

या प्रकरणाच्या पोलिस तपासाबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एम. एम. मुजावर म्हणाले, ""सतत वर्दळ असलेल्या चौकातील होर्डिंगचा सापळा उतरविताना रेल्वे प्रशासनाने योग्य काळजी घेणे गरजेचे होते. मात्र रेल्वे प्रशासनाने तसे केले नाही. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडला असल्याचे आम्हाला आढळले आहे.'' या घटनेस कारणीभूत असलेला ठेकेदार व कामगार दोघेही पळून गेले आहेत, त्यांचा शोध पोलिसांचे पथक घेत आहे, दोन दिवसांत त्यांना अटक होईल, असेही मुजावर यांनी स्पष्ट केले. 

25 हजारांची मदत 
दरम्यान, होर्डिंग दुर्घटनेमध्ये जखमी झालेले उमेश मोरे यांच्या उपचारासाठी त्यांच्या पत्नी सुवर्णा मोरे यांना फुले-आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे 25 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद अहिरे व पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे सदस्य अतुल गायकवाड यांच्या हस्ते मदतीचा धनादेश मोरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी विवेक मोरे, रोहन साळवे, संदीप बडेकर व प्रदीप जावळे उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com