होळीसाठी गोवऱ्या, टिमक्‍या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

होळीचा सण (होलिकोत्सव) अवघ्या एका दिवसावर (ता.१२) येऊन ठेपला आहे. यानिमित्त नागरिकांनी शुक्रवारी गोवऱ्या, एरंडाच्या फांद्या आणि बालगोपाळांसाठी टिमक्‍या आणि रंगखरेदीचा आनंद लुटला. 

अंगण शेणाने सारवायचे, रांगोळी काढून त्यात विविध रंग भरायचे, त्यावर रचलेल्या गोवऱ्या, लाकडे अन्‌ मध्यभागी उसाचे वाडे अन्‌ एरंडाची फांदी इत्यादींची पूजा करून होळी प्रज्वलित करण्यासाठी शहरात तयारी करण्यात येत आहे. 

फाल्गुन महिन्यातील शुद्ध पक्षातल्या या पौर्णिमेला ‘हुताशनी पौर्णिमा’ असेही म्हणतात. या दिवशी घरातील कुलदेवतांचे पूजन करून पुरणावरणाचा नैवेद्य दाखविण्यात येतो. शिशिर ऋतू सुरू झाल्याने वृक्षांची पानगळ होते. तसेच थंडीही ओसरू लागते, म्हणून ‘होळी जळाली, थंडी पळाली’ असेही म्हणतात. या सणासाठीच्या खरेदीसाठी महात्मा फुले मंडई येथील बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. 

उत्तर भारतीयांची ‘रंगणार’ होळी
होलिकोत्सवानिमित्त उत्तर भारतीय नागरिकांमध्ये रंग खेळण्याची प्रथा आहे. पुण्यात स्थायिक झालेले राजस्थानी नागरिकही मोठ्या उत्साहाने होलिकोत्सव साजरा करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन वद्य प्रतिपदेला अर्थात धूलिवंदनाच्या दिवशी त्यांच्याकडे लहान मुलांची ‘दुण्ड’ काढण्याचा पारंपरिक रीतिरिवाज असतो. यानिमित्ताने राजस्थानी नागरिक एकत्र येतात.
 
‘हिंदू जनजागृती’ करणार खडकवासलाचे रक्षण

रासायनिक रंग खेळण्यासाठी खडकवासला धरणात येणाऱ्या नागरिकांपासून जलाशयाचे रक्षण व्हावे, जलप्रदूषणाला आळा बसावा यासाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे येत्या १३ ते १७ मार्चदरम्यान ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ आयोजिले आहे. अभियानांतर्गत धरणाभोवती मानवी साखळी करून नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष पराग गोखले आणि समन्वयक प्रवीण नाईक यांनी दिली.

Web Title: holi celebration