जुन्नरला तहसील कार्यालयासमोर भातपिकाची केली होळी

दत्ता म्हसकर
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

जुन्नर -  पावसाअभावी नुकसान झालेल्या भात शेतीची तहसील व कृषी विभागाने पाहणी करावी, पिक पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी तसेच जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या व अन्य मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर आज सोमवार ता.22 रोजी मोर्चा काढण्यात आला.

आदिवासी विकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांचे नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोर्चेकरांनी जळालेल्या भात पिकांच्या पेंड्या आणल्या होत्या. या भात पिकांच्या पेंड्याची होळी करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या.

आदिवासी भागात मुख्यतः भात पीक घेतले जाते परंतु यावर्षी अपुऱ्या पावसाअभावी तालुक्यातील ८० टक्के भातपिकाचे नुकसान झाले आहे भात पीक जळून गेले आहे आदिवासी लोकांची जमीन धरणामध्ये गेली त्यांनाच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. भात पिकांचे पंचनामे सुरू केले नाहीत तर आम्ही बनकर फाटा-ओतूर येथे जनावरांसहित रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा लांडे यांनी यावेळी दिला. लोकप्रतिनिधीचे आमच्या प्रश्नांकडे लक्ष नाही त्यांना आदिवासी लोकांची काळजी राहिली नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली. शेकापचे तालुका अध्यक्ष रमेश हांडे यांनी मोर्चास पाठिंबा दिला. लवकरात लवकर पिकांचे पंचनामे केले नाहीत तर आम्ही तहसील कार्यालयास कुलूप लावू असा इशारा त्यांनी दिला.
 धरणातील 20 टक्के पाणीसाठा राखून ठेवावा,आदिवासी भागातील रस्ते नव्याने करावेत, माणिकडोह धरणातील बुडीत बंधाऱ्यांची कामे सुरू करावीत,धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत आदी मागण्याचे  निवेदन तहसीलदार हनुमंत कोळेकर यांना देण्यात आले. 

Web Title: Holi is done in front of Junior Tehsil office