Holi Festival 2023 : साधनातील विद्यार्थ्यांनी बनवले पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग

होळी, धुलीवंदन, रंगपंचमी या सणांमध्ये देशभर मोठ्याप्रमाणात रंगांची उधळण
Holi Festival 2023
Holi Festival 2023sakal

हडपसर : भारतीय सण, परंपरांमध्ये रंगांना विशेष महत्व आहे. सध्या वापरात येत असलेल्या रासायनिक रंगांनी पर्यावरणासह माणसाचे आरोग्यही मोठ्याप्रमाणात संकटात सापडले आहे. त्यादृष्टीने येथील साधना विद्यालय व आर.आर.शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.

Holi Festival 2023
Kolhapur School News : भाषा ३, शाळा १०२ अन् १२ हजार ११० विद्यार्थी

होळी, धुलीवंदन, रंगपंचमी या सणांमध्ये देशभर मोठ्याप्रमाणात रंगांची उधळण होत असते. हे रंग नैसर्गिक असावेत, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत प्रबोधन व्हावे, यासाठी साधना विद्यालयाने नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी विविध पानाफुलांचा वापर करून नैसर्गिक रंग बनविले.

Holi Festival 2023
Pune : तीस लाखाच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी जुन्नरच्या माजी नगरसेवकास अटक

"निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,प्रत्येकाने कुठलाही सण साजरा करतांना पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे गरजेचे आहे. होळी तसेच धुलीवंदन साजरा करत असताना पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग स्वतः पण वापरणे आवश्यक आहे,' असे मत साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी यावेळी व्यक्त केले.

उपप्राचार्य डॉ. अमिरुद्दीन सिद्दीकी, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, कुमार बनसोडे, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. धनाजी सावंत, राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com