Indapur News : इंदापूर मध्ये उजनीत मिळाला तब्बल 30 किलो वजनाचा मासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

holi festival 2023 ujani dam 30kg fish pune fishermen agriculture

Indapur News : इंदापूर मध्ये उजनीत मिळाला तब्बल 30 किलो वजनाचा मासा

इंदापूर : होळीच्या सणा दिवशी उजनी पाणलोट क्षेत्रात मच्छिमारांच्या जाळ्यात तब्बल 30 किलो वजनाचा सिल्व्हर जातीचा मासा सापडला त्यांस इंदापूर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासळी बाजारात 180 रूपये प्रतिकीलो प्रमाणे तब्बल 5 हजार 400 रुपयांचा भाव प्राप्त झाला. विशेष म्हणजे धूलवड सणाच्या निमित्ताने या माश्याची जोरदार चर्चा होत आहे.

इंदापूर तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या गोपाळ रजपूत व कृष्णा राजपूत यांना हा मोठा मासा जाळ्यात मिळाला. इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मासळी बाजारातील दत्तात्रय व्यवहारे यांच्या तेजश्री फिश मार्केट या आडत दुकानात तो तब्बल 5 हजार 400 रुपयांना विकत घेतला. सिल्व्हर जातीतील एवढा मोठा मासा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.असे व्यवहारे यांनी सांगितले.

टॅग्स :Pune NewsIndapurpunefish