शाळा सुटली; पाटी फुटली

Holidays-Special
Holidays-Special

पुणे - मित्रांनो, परीक्षेचा निकाल लागला असून, तुमची सुटी सुरू झाली आहे. या सुटीत तुमची धम्माल, मजा करण्याची प्रतीक्षा संपली आहे. तुमच्यासाठी ‘सकाळ’तर्फे धम्माल गोष्टी, मनोरंजक माहिती, खेळ, भटकंती, कोडी आणि विज्ञान खेळण्यांनी भरलेला खास सुटी विशेषांक येत्या शनिवारी (ता. ११) सकाळी दहाला प्रकाशित होत आहे. जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या हस्ते ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ते जादूचे प्रयोगही सादर करतील.  

सुटी आणि धम्माल, मस्ती, धिंगाणा हे समीकरणच आहे. सुटीमधील तुमचे नियोजन झालेही असेल. कोणी ट्रिपला, कोणी ट्रेकिंगला जाण्याची तयारी करत असेल, तर कोणी वासंतिक शिबिराला जाऊनही आले असेल, मोबाईल खेळून तुम्हाला कदाचित कंटाळाही आला असेल. आता सुटीत पुढे काय करायचे हा प्रश्‍न तुम्हाला आणि हो... पालकांनीही पडला असेल. उरलेली सुटी कशी घालवायची याची चिंता आता आमच्यावर सोडा!. ‘सकाळ’ तुमच्यासाठी घेऊन येत आहे दणदणीत मेजवानी. ‘शाळा सुटली, पाटी फुटली’ हा दोनशे पानांचा भरगच्च सुटी विशेषांक. रंजक गोष्टी, प्रयोगातून विज्ञान, रहस्य कथा, कोडी, टाकाऊपासून टिकावू वस्तू, पक्ष्यांच्या दुनियेची सफर करत असताना निसर्गाची नवलाई तुम्हाला या अंकातून अनुभवता येणार आहे.

जगातील अद्‌भुत वास्तूंची माहिती आणि स्वयंपाकघरातील विज्ञान या विशेषांकात उलगडून दाखविले आहे. त्याचबरोबर मेकअपच्या माध्यमातून चित्रपटांच्या अंतरंगातही डोकावण्याची संधी आहे. प्राचार्य डॉ. मिलिंद नाईक, डॉ. संजय ढोले, दा. कृ. सोमण, कांचनगंगा गंधे, एकनाथ आव्हाड आदी विविध मान्यवर लेखकांनी या विशेषांकात लेखन केले आहे. विशेषांकात मुलांबरोबरच पालकांसाठीही विशेष लेख आहेत. पालकत्व म्हणजे काय, मुलांचे संगोपन कसे करायचे आदी विषयांवर तज्ज्ञ लेखकांनी मार्गदर्शन केले आहे.

वाट कसली पाहताय, आपला अंक नोंदणीसाठी ९८८१०९९२३० या क्रमांकावर मिसकॉल द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com