नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना घरपोच नोटिसा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

पुणे - वाहतुकीचे नियम मोडण्यात, तर कोणी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालण्यात आघाडीवर असल्याचे चित्र रोटरी क्‍लब ऑफ पुणे शनिवारवाडाच्या सदस्यांना दिसून आले. 

रोटरी क्‍लब आणि शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्‍त विद्यमाने नळ स्टॉप चौकात शुक्रवारी वाहतूक अभियान राबविण्यात आले. यात सहभाग नोंदवून रोटरी क्‍लबच्या सदस्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची छायाचित्रे काढली. त्या वेळी काही वाहनचालक आपली वाहने झेब्रा क्रॉसिंगच्या मागे घेत होते, तर काही जण सिग्नल तोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. 

या अभियानात रोटेरियन दिलीप कुंभोजकर, उदय कुलकर्णी, प्रकल्प संयोजक दिलीप देशपांडे, रोटरी क्‍लब ऑफ पुणे शनिवारवाडाच्या अध्यक्षा मीना भोंडवे, सचिव अनिता पाटील, सुभाष दांडेकर आणि वाहतूक शाखेतील कर्मचारी रमेश रावण आदींनी सहभाग घेतला. प्रकल्प संयोजक दिलीप देशपांडे म्हणाले, ""नळ स्टॉप चौकातील सिग्नलचे सुसूत्रीकरण केल्यास येथील कोंडी कमी होण्यास मदत होईल.'' 

निदर्शनास आलेल्या बाबी... 
- सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये बहुतांश वाहने शहराबाहेरील 
- स्टॉप लाइन (थांबा पट्टी) ऐवजी झेब्रा क्रॉसिंगवर वाहने 
- अनेकांना सिग्नल तोडून जाण्याची घाई 
- चालकांना झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागे वाहन घ्या, असे सांगावे लागत होते 

पोलिसांकडून घरपोच नोटिसा 
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसुलीसाठी घरपोच नोटिसा पाठविण्यात येत आहेत. येत्या काही दिवसांत कारवाईचा वेग आणखी वाढविण्यात येईल. पोलिस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Web Title: Home delivery of notices to those who violate the rules

टॅग्स