घरगुती गॅसची गळती होऊन स्फोट, दोन जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

वारजे माळवाडी - घरगुती गॅसची गळती होऊन झालेल्या मोठ्या स्फोटात पती- पत्नी जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजल्यानंतर घडली. वारजे माळवाडीत गीतांजली सोसायटीत नगरसेविका दीपाली धुमाळ यांच्या कार्यालयाच्या शेजारी घडली. जखमींना रुग्णवाहिकेमधून खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे.

ज्ञानेश्वर वाचकवडे (वय 55), व छाया वाचवडे (वय 50) हे पती- पत्नी यात जखमी झाले आहेत. ज्ञानेश्वर हे रिक्षा चालवितात. पती पत्नी घरी होते. त्यांचे मुले त्यावेळी घरी नव्हती. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यांचा येथे सावली माऊली नावाचा बंगला होता. दोन मजली घर आहे. तळमजल्यावर ही घटना घडली. 

स्फोटाचा आवाज मोठा होता. तसेच, घराचा सेफ्टी दरवाजा 40 फूट उडून एका इमारतीला जाऊन आपटला. किचन मधील ग्रॅनाईड फुटले आहे. दरवाजे तुटले, बाहेरच्या बाजूच्या भिंतीला तडे गेले आहेत. सिमेंटचा पत्रा फुटला आहे. असे कोथरुड अग्निशमन दलाचे गजानन पाथरूडकर यांनी सांगितले. घरात थोडी कपड्यांना आग लागली होती. पाणी मारले. सिलेंडर घराबाहेर काढुन ठेवले आहे. 

ज्ञानेश्वर गंभीर जखमी झालेत तर स्फोटाचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नी छाया यांचा रक्तदाब वाढला होता. तातडीने रुग्णवाहिका बोलाविली. त्यांना उपचारासाठी पाठविले. शेजारील घरांच्या काचा, ग्रील, मार्बल फुटले आहे. असे माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी सांगितले. 

Web Title: Home gas leakage blast, two injured