पुण्यात पोलिस महासंचालक परिषदेला गृहमंत्र्यांचे मार्गदर्शन

Home Minister Amit Shah Attend Top Police Officials Conference In Pune
Home Minister Amit Shah Attend Top Police Officials Conference In Pune

पुणे : पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) तीन दिवसीय वार्षिक पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून कडेकोट पोलिस बंदोबस्तात सुरूवात झाली. राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीच्या या परिषदेला पहिल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थिती लावून मार्गदर्शन केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी व रविवारी या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता त्यांचे लोहगाव विमानतळावर आगमन झाले.

पाषाण रस्त्यावरील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) संस्थेच्या आवारात परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेसाठी देशभरातुन 180 हून अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. या परिषदेचा प्रारंभ झाल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहभाग घेत देशभरातील पोलीस महासंचालकांना मार्गदर्शन केले. या निमित्ताने त्यांच्या हस्ते एका पुस्तिकेचे प्रकाशन झाले. परिषदेत होणाऱ्या "नार्को टेररीझम' या विषयावरील चर्चेतही शहा हे सहभाग घेणार आहेत. परिषदेचा मुख्य विषय न्यायवैद्यकीय व शास्त्रीय तपास असा आहे. याबरोबरच तंत्रज्ञानातील बदल, देशाअंतर्गत सुरक्षा या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे.

कांदा न खाल्ल्याने कोणी मरत नाही- बच्चू कडू

दरम्यान, पंतप्रधान मोदी शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता लोहगाव विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर राज्यपाल भगतसिंग कोशियारी, गृहमंत्री शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत रतेथून ते थेट राजभवन येथे मुक्कामासाठी रवाना झाले. शनिवारी व रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला संबोधित करणार आहेत. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर हेही सहभाग घेणार आहेत. रविवारी परिषदेची सांगता होणार आहे. दरम्यान, परिषद होत असलेल्या आयसर संस्थेच्या आवारात तसेच पाषाण, बाणेर रस्त्यावर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याबरोबरच पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांचा मुक्काम असलेल्या राजभवन परिसरामध्येही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच मोदी-ठाकरेंची भेट

डिजी कॉन्फरन्स'मधील यापुर्वीचे विषय
पोलिस महासंचालक परिषदेत दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षिततेला प्राधान्य देऊन त्यादृष्टीने चर्चा केली जाते. याबरोबरच विविध प्रकारच्या समस्या व त्यावरील उपाययोजानांवरही सखोल विवेचन होते. यापुर्वीच्या परिषदांमध्ये जम्मु कश्‍मीरमसह देशाला असणारा दहशतवादाचा धोका, दहशतवाद्यांकडून सीमारेषेचे होणारे उल्लंघन, जम्मु व कश्‍मीरमधील कट्टरपंथी तरुण, नक्षलवाद, मानवी तस्करी, कम्युनिकेशन टेक्‍नॉलॉजी, सायबर सिक्‍युरीटी या विषयांवर चर्चा झाली आहे. यावेळी न्यायवैद्यकीय व शास्त्रीय तपास हा परिषदेचा मुख्य विषय आहे.

डिजी कॉन्फरन्स' गुजरातनंतर महाराष्ट्रात
डिजी कॉन्फरन्स' वर्षानुवर्षे दिल्लीपुरती मर्यादीत होती. मात्र 2014 पासून नरेंद्र मोदी यांनी ही परिषद देशातील अन्य राज्यांमध्ये नेण्यास प्राधान्य दिले. अमित शहा यांनी जबाबदारी गुप्तचर विभागाकडे (आयबी) दिली. आत्तापर्यंत 2014 मध्ये गुहावटी (आसाम), 2015 मध्ये कच्छ (गुजरात), 2016 मध्ये तेलंगाणा (हैद्राबाद), 2018 मध्ये केवाडिया (गुजरात) येथे परिषद झाली. गुजरातनंतर आता ही परिषद महाराष्ट्रात होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com