60 वर्षात कोणत्याही गृहमंत्र्याने केलं नाही ते देशमुख यांनी केलं

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अद्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी विधानभवन येथे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व अधिकाऱ्याची बैठक घेतली होती. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या बैठकीस हजेरी लावली. या बैठकीनंतर देशमुख यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यासमोर असलेल्या प्रादेशिक न्यायसहायक प्रयोगशाला येथे सायंकाळी 5 वाजता भेट दिली.

पुणे :  विविध प्रकारचे गुन्हे सिद्धिसाठी पोलिस प्रशासनाला विज्ञानिकदृष्टया सहकार्य करणाऱ्या प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला शुक्रवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली. प्रयोगशाळेत काम करणाऱ्या सर्वांशी संवाद साधला, तसेच त्यांच्या अडचणी समजुन घेतल्या. मागील 60 वर्षात या प्रयोगशाळेला राज्याच्या गृहमंत्र्यांनी पहिल्यादा भेट दिल्याचा दावा केला आहे

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

Image may contain: 2 people, people sitting, people standing and beard

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अद्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी विधानभवन येथे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व अधिकाऱ्याची बैठक घेतली होती. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या बैठकीस हजेरी लावली. या बैठकीनंतर देशमुख यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यासमोर असलेल्या प्रादेशिक न्यायसहायक प्रयोगशाला येथे सायंकाळी 5 वाजता भेट दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी प्रयोगशाळेचे उपसंचालक राजेंद्र कोकरे यांनी गृहमंत्र्यांच्याचे स्वागत करून  त्यांना  प्रयोगशाळेत होत असलेल्या विविध कार्याविषयीची सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये  प्रामुख्याने सायबर गुन्हे,  ध्वनी व ध्वनीफीत  विश्लेषण, जीवशास्त्र, डीएनए, विषशास्त्र, सामान्य विश्लेषण व उपकरणे, दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागामध्ये करण्यात येणाऱ्या कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली.

पुणे : ग्रामीण भागात वाढलाय सापांचा वावर; सर्पदंश झाल्यास...

गृहमंत्र्यांसोबत झालेल्या या चर्चेत सहाय्यक संचालक धर्मशिला सिन्हा, निलिमा बक्षी, सोनाली फुलमाळी, वैशाली शिंदे, अंजली बडदे, महेंद्र जावळे आदींनी सहभाग घेतला.

दरम्यान, गुन्हे सिद्ध होण्यास या प्रयोगशाळेचे  कार्य महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद आहे,असे सांगत देशमुख यांनी प्रयोगशाळेच्या कामाचे भरभरुन कौतुक केले. तसेच प्रयोगशाळेला येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे आश्वासनही दिले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Anil Deshmukh visits Regional Forensic Science Laboratory in pune