पंतप्रधान आवास योजनेंतर्गत चऱ्होली, रावेतला गृहप्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवाडी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. त्याबाबतचे सादरीकरण संबंधित ठेकेदाराकडून महापालिका सर्वसाधारण सभेत सोमवारी झाले. हे तिन्ही प्रकल्प तीन हजार ६६४ सदनिकांचे आहेत. त्याविषयी अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी सदर विषय तहकूब ठेवण्याची सूचना स्थायी समिती सभापती बिलास मडिगेरी यांनी मांडली. त्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी आवास योजनेचा विषय तहकूब केला.

पिंपरी - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवाडी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. त्याबाबतचे सादरीकरण संबंधित ठेकेदाराकडून महापालिका सर्वसाधारण सभेत सोमवारी झाले. हे तिन्ही प्रकल्प तीन हजार ६६४ सदनिकांचे आहेत. त्याविषयी अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी सदर विषय तहकूब ठेवण्याची सूचना स्थायी समिती सभापती बिलास मडिगेरी यांनी मांडली. त्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी आवास योजनेचा विषय तहकूब केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवाडी गृहप्रकल्प उभारणीचे काम सुरू झाले. साधारणतः १४ व १५ मजली इमारती असतील. एका इमारतीत ३० चौरस मीटर चटई क्षेत्राच्या सदनिका असतील.

पिंपरी-चिंचवडमध्ये 'दादागिरी’त कोणाचे प्राबल्य?

असा करा अर्ज
इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रिंट काढून आवश्‍यक कागदपत्रांसह पाच हजार रुपयांचा डीडी जोडायचा आहे. कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासबुक, वीजबिल यांचा समावेश आहे. पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे जोडायची आहेत.

आयुक्तालयातील कामामुळे पोलिसांची बदलीसाठी धावाधाव

असा भरा स्वहिस्सा
केंद्र व राज्य सरकारकडून प्रतिसदनिका अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. स्वहिस्सा तीन टप्प्यांत भरायचा आहे. त्यासाठी पहिला व दुसरा टप्पा ४० टक्के रक्कम आणि तिसऱ्या टप्प्यात २० टक्के रक्कम भरायची आहे.

स्वतःच्या नावावर कुठेही घर किंवा जमीन नसलेली व्यक्ती आवास योजनेतील सदनिकेसाठी अर्ज करू शकते. मात्र, त्यांचे उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे. अर्जासोबत पाच हजार रुपयांची रक्कम ॲडव्हान्स म्हणून घेतली जाणार आहे.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home project in charholi and ravet by prime minister home scheme