घर भाड्याने घेण्यास पसंती

अभिषेक मुठाळ
गुरुवार, 14 जून 2018

पुणे - घरांच्या वाढलेल्या किमती, बॅंकांचे चढे व्याजदर, कामाच्या ठिकाणी घर मिळण्याची कमी शक्‍यता अशा अनेक कारणांमुळे पुण्यात घर भाड्याने घेण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. नोंदणी कार्यालयाच्या नोंदीनुसार पुण्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत अकरा टक्‍क्‍यांनी भाडेकरारात वाढ झाली आहे. ई-नोंदणीमुळेही भाडेकरार करणे अधिक सोयीचे झाले आहे.  

पुण्यात शिक्षण आणि नोकरीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सर्वांना सामावून घेण्यासाठी शहरात विशेषत: उपनगरांमध्ये मोठ्याप्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहत आहेत. मात्र, घरांच्या वाढलेल्या किमती, त्यांच्या देखभालीचा खर्च, आवश्‍यक त्या ठिकाणी उपलब्धता यामुळे स्वत:च्या घरापेक्षाही घर भाड्याने घेण्याकडे कल वाढला आहे. 

घर भाडेकरार हा महाराष्ट्रात बंधनकारक असून, त्याच्या नोंदणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. त्यात ई-नोंदणीमध्ये मोठे वाढ दिसते. पुण्यात यावर्षात मे महिन्यापर्यंत एकूण २० हजार २९१ घरभाडे करार झाले, तर मुंबईत २३ हजार २२२ घर भाडेकरार झाले आहेत. पुणे ग्रामीणमध्ये एकूण भाडेकरारात ८२ टक्‍के ई करार झाले आहेत. पुण्यात स्थलांतर करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. शिक्षणाबाबत स्थिती चांगली असल्याने मुलांचा पुण्याकडे कल वाढत आहे. पायाभूत सुविधांची वाढ झाल्याने लोक दूर रहायलासुद्धा तयार आहेत, असे महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष शांतिलाल कटारीया यांनी सांगितले.

नागरिकांचा  ई-नोंदणीकडे कल वाढावा याकरिता प्रचार आणि प्रसार करतो. त्याचा परिणाम म्हणजे पुणे आणि ठाणे या दोन विभागांत ८० टक्‍के घरभाडे करार ई-नोंदणीने झाले.  ‘मॉर्गेज’साठी लागणारी नोटीस ऑफ इिन्टमेशनसुद्धा आता ऑनलाइन पद्धतीने देता येणार आहे. घर भाडेकरार नोंदणीच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.
 - अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक

पुण्यात हिंजवडी भागात घर विकत घेणे परवडण्यासारखे नाही, म्हणून आम्ही भाड्याने राहतो. ई-नोंदणीमुळे कार्यालयात न जाता आम्ही हा करार घरूनच करू शकलो.
- पूजा मुळे

Web Title: home on rent basis priority