Coronavirus : घरगुती बैठे खेळ रंगू लागले

carrom
carrom

पिंपरी - टीव्ही आणि मोबाईल पाहून कंटाळलेल्या आबालवृद्धांनी घरातच बैठे खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे. तर, खेळाडू आणि व्यायामप्रेमी नागरिक घरातच व्यायाम, कसरती चालू ठेवण्यावर भर देत आहेत. 

शहरात गणेश तलाव, प्राधिकरण, मोरया क्रीडा संकुल, चिंचवड गाव, स्पाइन रस्ता आणि इंद्रायणीनगर येथे हौशी धावपटू नियमित सराव करत असतात. स्नायूंचे बळकटीकरण, योगासने, लांब धाव, दीर्घ पल्ल्याची धाव आदींचा देखील तेथे सराव केला जातो. मात्र, मागील आठवडाभरापेक्षा जास्त काळापासून सर्वत्र लॉकडाऊन ची परिस्थिती असल्याने सर्वजण घरातच बसून आहेत. गिर्यारोहण, क्रिकेट, किक बॉक्सिंग, जलतरण, कराटे यासारखे खेळदेखील बंद झाले आहेत. मात्र, त्यातूनही खेळाडू आणि व्यायामप्रेमींनी घरबसल्या मार्ग काढला आहे.

पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, लुडो यासारखे घरगुती बैठे खेळ रंगू लागले आहेत. त्याचबरोबर, योगासने, सूर्य नमस्कार, दोरीच्या उड्या आदी कसरतींवर भर दिला जात आहे. 
कॉम्रेड मॅरेथॉन धावपटू चंद्रकांत पाटील म्हणाले, "सध्या धावणे, सायकलिंगचा सराव बंद आहे. मात्र, अनेक हौशी धावपटू घरातच सूर्य नमस्कार, जोर-बैठका, दोरीवरील उड्या, योगासने आणि टपाटा यासारखे व्यायाम प्रकार करत आहेत. टपाटामध्ये १० ते १२ व्यायाम प्रकारांचा समावेश आहे." इंडो अॅथलेटिक सोसायटीचे अध्यक्ष गजानन खैरे म्हणाले, "घराबाहेर पडून सायकलिंग करणे शक्य नसल्याने आमचे ५० ते ६० सदस्य घरातच सायकलिंग ट्रेनरवर सराव करत आहेत. टीव्हीला केबल जोडून जीपीएस नकाशाद्वारे सायकलिंग करत आहेत." थेरगाव येथील पीसीएमसीज व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे फिजिकल ट्रेनर डॉ. विजय पाटील म्हणाले, "लॉकडाऊनची घोषणा होण्यापूर्वीच अकादमी बंद करून खेळाडूंना घरीच व्यायाम, कसरती करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार मुले त्याकडे लक्ष देत आहेत. करोनामुळे ११ व १२ एप्रिलला खेळाडूंची होणारी निवड चाचणी देखील तूर्तास स्थगित करण्यात आली आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com