मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

मिलिंद संधान
सोमवार, 25 जून 2018

नवी सांगवी (पुणे) - मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने पिंपळे गुरव येथे दहावी व बारावी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता. ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, संत अभ्यासक बब्रुवाहन वाघमहाराज, प्रबोधकार शारदा मुंढे, स्विकृत प्रभाग सदस्य गोपाळ माळेकर व संघाचे अध्यक्ष अरूण पवार यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी व्यासपिठावर संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या आदिती निकम, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामचंद्र कदम, प्राचार्य वसंतराव जगदाळे, गणेश ढाकणे उपस्थित होते.

नवी सांगवी (पुणे) - मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने पिंपळे गुरव येथे दहावी व बारावी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता. ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, संत अभ्यासक बब्रुवाहन वाघमहाराज, प्रबोधकार शारदा मुंढे, स्विकृत प्रभाग सदस्य गोपाळ माळेकर व संघाचे अध्यक्ष अरूण पवार यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी व्यासपिठावर संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या आदिती निकम, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामचंद्र कदम, प्राचार्य वसंतराव जगदाळे, गणेश ढाकणे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थांना सन्मानचिन्ह, फाईल फोल्डर व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. 

वाघमहाराज म्हणाले, " एकीकडे विद्वान अभियंत्यांनी बनविलेल्या गगनचुंबी इमारतींची उंची वाढत असताना माणुसकी नाहीशी होताना दिसते आहे. त्यामुळे स्पर्धेच्या या युगात रस्सीखेच अथवा एकमेकांचे पाय न ओढता प्रत्येकाने खांद्याला खांदा लाऊन काम केले पाहिजे. प्रेमाने जग जिंगता येते, संतांच्या प्रेमाने देवालाही पृथ्वीवर पहावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ गुणवंत न होता शिलवंत होणेही गरजेचे आहे. "

सुर्यंकांत कुरूलकर प्रास्ताविक केले. दत्तात्रेय धोंडगे यांनी सुत्रसंचलन तर वामन भरगांडे यांनी आभार मानले.

Web Title: Honor of the meritorious students by Marathwada Janvikas Sangh

टॅग्स